Home Social प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली गावातून प्रभात फेरीत…  — सांस्कृतिक...

प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली गावातून प्रभात फेरीत…  — सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधलें पळसगांव नागरिकांचे लक्ष…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

          चिमूर तालुक्यातील पळसगांव (पि.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,शिवानी माध्यमिक विद्यालय तथा स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रम शाळा पळसगांव द्वारे सकाळी काढलेल्या प्रभातफेरीतने संपूर्ण गावांचे लक्ष वेधले.

           जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे अध्यक्ष प्रकाश ढोक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सरीता गुरुनुले,उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,ग्रामपंचायत सदस्य तथा रोजगार हमी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदिप गजभिये,ग्रामपंचायत सदस्य हपिज शेख,ग्रामपंचायत सदस्या सरिता मेश्राम,पोलीस पाटील रागिना दडमल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

           मुख्य कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जनार्धन देहारे,अंगणवाडी कर्मचारी रामकला पाटील,शिला मोहुर्ले,संघमित्रा खोब्रागडे,प्रियंका गोरडवार,श्वेता रामटेके,अतिशा चौधरी,सि.आर.पि.अजिरा गजभिये,शिवानी माध्यमिक विद्यालयचे शिक्षक,स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक, आशा वर्कर वैशाली पाटील,गुळधे,विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.