माणसाचे बालपण हे संस्कारक्षम असते आणि तरुण पण हे साहसी आणि धाडसी असते,आक्रमक असते. स्वार्थी आणि धूर्त लोक या वयाचा गैरफायदा घेतात किंवा दुरुपयोग करतात. बालपणात शालेय इतिहास जो शिकविला जातो त्याचे परिणाम बालमनावर होतात आणि त्याचा उपयोग तरुणपणी होतो.
इतिहास हा केवळ एकच प्रकारचा नसून इतिहासाचे अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, धार्मिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास. यातील फक्त राजकीय इतिहासच मुलांना शिकविला जातो, आणि तोही केवळ सत्तेचा इतिहास शिकविला जातो, एकांगी इतिहास शिकविला जातो. राजकीय सत्तेचा इतिहास शिकवताना त्यातील फक्त एकच बाजू पाहिल्या जाते त्याची दुसरी बाजू पाहिल्या जात नाही. राजकीय इतिहासात माणसाला माणूस जोड ण्याचे पण अनेक प्रसंग आहेत, तडजोड शलोखा मैत्री सहजीवन या गोष्टी शिकवणारा पण राजकीय इतिहास आहे, तसेच द्वेष मत्सर कपट दुराभिमान भांडणे मारामाऱ्या हिंसा या गोष्टी शिकवणारा पण राजकीय इतिहास आहे, माणसाला माणूस जोडणारा इतिहास शिकायचा की माणसापासून माणसाला तोडण्याचा इतिहास शिकायचा? हा तर खरा प्रश्न आहे.
माणूस आपल्या बुद्धीच्या आधारे आपले जीवन सुखी आणि विकसित करण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु या त्याच्या प्रयत्नात काही स्वार्थी खूप बुद्धीचे लोक अडचणी निर्माण करीत असतात. माणसाला आपले जीवन सुखकर आनंदी समाधानी आणि समृद्ध करायचे असल्यास, विकसित करायचे असल्यास “माणसाला माणूस जोडणे “हाच विचार करून, इतिहासातील सुवर्ण पाणी शोधले पाहिजेत, तसेच धर्माचा इतिहास शिकत असताना किंवा पाहत असताना त्यातील मानव धर्म कोणता ? त्याचाच शोध घेतला पाहिजे. इतिहास संशोधन करत असताना, इतिहासाचा दुरुपयोग न होता सदुपयोगच केला पाहिजे, वर्तमान घडविण्यासाठी किंवा वर्तमान सुधारण्यासाठी इतिहासातील माणसाला उपयोगी पडणारे प्रसंग शोधले पाहिजेत, राजकीय इतिहासाचा अभ्यास करताना किंवा उपयोग करताना, राजकीय इतिहास म्हणजे केवळ सत्तेची भांडणे, असा अर्थ न घेता, सत्तेतील सलोखा तडजोड सामंजस्य, इतिहासातील समृद्धी विकास या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. इतिहास म्हणजे केवळ सत्तेसाठी भांडणे मारामाऱ्या आणि हिंसा जरी असला तरी इतिहासात राजे राजवाड्यांनी जनतेच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी ज्या ज्या तडजोडी सलोखा आणि प्रयत्न केले, सहजीवन जगण्याचा चे अनेक प्रयोग केले, त्या प्रसंगांचा उल्लेख इतिहासात झाला पाहिजे, अशाच उज्ज्वल ऐतिहासिक परंपरांचा किंवा परंपरांच्या नोंदी म्हणजेच इतिहास अशी व्याख्या केली पाहिजे.
इतिहासाचा उपयोग धार्मिक दंगली भांडणे मारामाऱ्या करण्यासाठी करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, अज्ञान पणाचे लक्षण आहे किंवा कपटकारस्थान आहे केवळ सत्तेसाठी, असाच त्याचा अर्थ निघतो.
सांस्कृतिक इतिहास असो की धार्मिक इतिहास असो की राजकीय इतिहासात असो, त्यात माणूस माणसाला जोडणारे अनेक प्रसंग कार्य कृती आहेत तसेच माणसाला माणसापासून तोडण्याचे पण अनेक प्रसंग आहेत, परंतु आपल्याला आपले वर्तमान आणि आपल्या मुलांचे भवितव्य सुखकर करायचे असल्यास इतिहासातील सुवर्ण पानांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहासाचा उपयोग भांडणे मारामाऱ्या हिंसा करण्यासाठी करणे, धार्मिक तेढ लावून वर्तमान बिघडविणे यासाठी करणे आणि तेही सत्तेवर असणाऱ्या लोकांनी करणे हे तर अत्यंत लांचनीय गोष्ट आहे, लोकशाहीत तर अशी गोष्ट म्हणजे तोंडाला काळीमा फासण्यासारखेच आहे.
सत्तेमध्ये बसलेल्या पक्षांचे किंवा सरकारचे काम हे विकृत इतिहास न लिहिता सकृत इतिहास लिहिणे, वर्तमान आणि भविष्याला उपयोगी पडेल, माणूस माणसाला जुळेल असाच इतिहास मुलांना शिकविला पाहिजे किंवा असाच अभ्यासक्रम बनविला पाहिजे, परंतु जे पक्ष सत्तेत येतात आणि आपले सरकार बनवितात ते पक्ष सत्तेचा गैरवापर करतात, बालपणात मुलांना शालेय अभ्यासक्रमात विषमतावादी इतिहास शिकवितात, आर्थिक विषमतेचे आणि सामाजिक विषमतेचे गोडवे जाणारी धडे आणि प्रसंग पुस्तकाच्या म्हणजे इतिहास विषयाच्या पुस्तकात लिहिल्या जातात, कारण सत्तेत जर विषमतावादी विचाराचे लोक बसले तर ते तसेच करणार, आणि सत्तेत जर समतावादी विचाराचे लोक गेले तर ते समतावादीच इतिहास लिहिणार, हे सरळ सरळ उघडच आहे, परंतु मतदार जागृत नसल्यामुळे असे घडत असते. मतदार सुज्ञ नाही, विषमता आणि समता यातील फरक त्यास समजत नाही, समजला तरी समजत नाही, कळत नाही, कळले तरी वळत नाही, अशी परिस्थिती मतदाराची आहे, त्यामुळे इतिहास चुकीचा लिहिला लिहिल्या जात आहे, किंवा वर्तमानाला उपयोगी असा लिहिल्या जात नाही.
इतिहासात दोन्हीही परंपरा सापडतात, उज्वल परंपरा आणि अंधकारी परंपरा, वर्तमान बिघडवणारी परंपरा आणि वर्तमान सुधारणारी परंपरा इतिहासात असते, परंतु आपण कोणती परंपरा स्वीकारायची हे स्वार्थी आणि निस्वार्थी बुद्धीवर अवलंबून असते. कुरापती बुद्धी ही विषमतेचा इतिहास स्वीकारते, आणि सुबुद्धी ही समतेचाच विचार आणि इतिहास स्वीकारते. परंतु कु बुद्धीचे आणि दुर्गुणी उमेदवार कोण आणि सुबुद्दीचे सद्गुणी उमेदवार कोण यातील फरक करण्याची पार्क मतदारात नसते किंवा त्यांची काही मजबुरी असते किंवा काही मतदार हे माहीत असू नये चुकीचे निर्णय घेतात, मूर्खपणा करतात यामुळे चुकीचा इतिहास मुलांना शिकविला जातो आणि शालेय वयातील मुले जेव्हा तरुण बनतात तेव्हा ते बिघडलेले असतात, ते आक्रमक बनून वर्तमान बिघडवीत असतात. भांडणे मारामाऱ्या चोऱ्या तोडफोड आणि हिंसा करण्यास प्रवृत्त होतात. कारण त्यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करणारा इतिहास शिकविला जातो. धार्मिक सलोखा करणारा इतिहास पण आहे पण तो दाखविल्या जात नाही. सामाजिक सलोख्याचा पण इतिहास आहे पण तो मुलांना शिकविल्या जात नाही, तर सामाजिक आणि धार्मिक तेढ कशी निर्माण होईल म्हणजेच विषमता कशी निर्माण होईल किंवा आर्थिक आणि सामाजिक विषमता कशी टिकून राहील यासाठीच सत्तेतील लोक प्रयत्न करीत असतात.
विषमता आणि समता म्हणजे काय ? यातील फरक काय ? विषमतेचे दुष्परिणाम काय ? आणि समतेचे सु परिणाम काय ? याचा अभ्यास जोपर्यंत जनतेला विशेषतः मतदाराला होणार नाही, तोपर्यंत वर्तमान हे बिघडलेलेच असणार आहे, म्हणून आपल्या मुलांचे भवितव्य हे अंधार मयच असणार यात वाद नाही.
प्रत्येक व्यक्तीने जातीने आणि धर्माने आपल्या पूर्वजांचा शौर्यमय इतिहास जरूर शोधावा परंतु त्या शौर्याचा उपयोग वर्तमान बिघडविण्यासाठी नसून वर्तमान सुधारण्यासाठी करावा, विषमता वाढविण्यासाठी नसून समता प्रस्थापित करण्यासाठी करावा, इतिहासातील आपल्या पूर्वजांचा उज्ज्वल परंपरा चा इतिहास शोधावा, आपल्या पूर्वजांनी इतिहासात केलेले समतेचे कार्य शोधावे संशोधन करावे आणि तसाच इतिहास लिहावा, आपल्याला जर क्षमतेचा इतिहास सापडला तरच समतेचे वर्तमान निर्माण होईल, आणि इतिहासातील विषमता जर आपण शोधली तर वर्तमानपण विषमतेवेचच असेल यात शंका नसावी. आणि वर्तमान विषमतेचे असेल तर भविष्य पण तेच असणार.
म्हणून भूतकाळातील समता वर्तमान काळात आणि वर्तमान काळातील समता भविष्यात निर्माण करण्याचा संकल्प करू या.


