Home Vidarbha जे.एस.पी.एम.महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन…

जे.एस.पी.एम.महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

        जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धानोरा येथे दि. 26 व 27 जानेवारीला अरण्यदीप-युवा सांस्कृतिक महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे त्याचे औचित्य साधुन ग्रंथालय विभागातर्फे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनामध्ये विवीध संदर्भ ग्रंथ, द्यानकोश, सामान्यज्ञान, कथा-कादंबरी तसेच इंग्रजी व मराठी साहित्याची पुस्तके ठेवण्यात आली होती. 

              ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन साहाय्यक पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा, अनिकेत हिरडे तथा गणेश माळी तहसीलदार धानोरा यांच्या हस्ते करण्यात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय थूल सर होते. तर प्रमुख पाहूने म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आनंद मधुरपवार होते.

           कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रविण गोहणे यांनी केले तर आभार प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले.ग्रंथ प्रदर्शनाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद होता.