Home Social नंदलाल पाटील कापगते विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- दि.26 जाने.2026

            स्थानिक नंदलाल पाटील कापगते विद्यालयाच्या भव्य प्रांगणात 77 वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.बी कापगते व शैक्षणिक सत्र 2024 – 25 मध्ये वर्ग पाचवी मधून प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.श्रावणी विनोद गौपाले यांचे संयुक्त पवित्र हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          प्रसंगी ध्वजारोहण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.श्री.हेमकृष्णजी कापगते, डॉ.सौ. शकुंतला कापगते श्री.सपनभाऊ शरद कापगते नगरसेवक, मा.श्री. ऋग्वेदजी येवले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मा. डॉ. महादेवजी लेंढे मा.श्री.अविशकुमार भैसारे, मा.श्री. मुरलीधरजी गजापुरे, मा.श्री.डी.डी.कोसलकर, मा.श्री.टी.जी. परशुरामकर मा.श्री.एन.बी.नाकाडे मा.श्री.केदारनाथ पंधरे, मा.श्री.वाय.बी.कापगते, मा.श्री.एम.व्ही. कापगते, मा. श्री. एम. टी. कोचे, मा.श्री.एस.एच. कापगते, मा.श्री.एम.एम. कापगते, मा.श्री.बी.पी. बोरकर,मा.श्री. सी. जी.झोळे,मा.श्री.सी.बी.कापगते, श्रीमती.आर. बी. कापगते सौ.तनुजाताई हत्तीमारे,सौ.कीर्ती अनिल बावनकर तथा सर्व सन्मानीय पालकवर्ग आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

              ध्वजारोहणानंतर आदरणिय व्यासपीठासमोर विद्यालयातील आर.एस.पी कॅडरच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथसंचलन तर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकवर्गासमोर भाषणे, देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करून भरभरून कौतुक व टाळ्यांची थाप मिळवली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा साकोली मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भरीव कामगिरी केलेल्या शालेय प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवर मंडळीचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

           “अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्य मिळवले, पण 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक झालो. या दिवशी भारताने स्वतःचे कायदे स्वतः ठरवण्याचा अधिकार प्राप्त केला. हजारो स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, महापुरुषांचे विचार आणि जनतेचा संघर्ष यामुळेच हा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे. या दिवसाचे पावित्र्य सदैव विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जपले पाहिजे” असे आव्हाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याधापक श्री.आर.बी. कापगते यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले

          कार्यक्रमाचे संचालन श्री. के. जी. लोथे यांनी तर उपस्थित मान्यवर मंडळी व पालक वर्गाचे आभार सौ.एस.एन. गहाणे मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाचा शेवट वंदेमातरम या गीताने करण्यात येऊन विद्यार्थ्यांना होमगार्ड परेड ग्राउंडवरील ध्वजारोहण कार्यक्रमारिता पाचारण करण्यात आले.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.