Home सांस्कृतिक श्री संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंध तीर्थक्षेत्र येथे 56 वा संत...

श्री संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंध तीर्थक्षेत्र येथे 56 वा संत संमेलन व गोपालकाला 30 जानेवारी पासून… 

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

साकोली : श्री संत विदेही मोतीराम बाबा आश्रम सावरबंद तीर्थक्षेत्र येथे दिनांक 30 जानेवारी 2026 ते 2 फेब्रुवारी 2026 संत संमेलन व गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले आहे.

        सावरबंध तीर्थक्षेत्रातील सरपंच माधवी बडवाईक यांनी आरोग्य सुविधा, पोलीस प्रशासन व्यवस्था,फिरते शौचालय ,शुद्ध पेयजलाची व्यवस्था, आश्रमात भावीक भक्तांना राहण्याची सोय इत्यादी सुविधा असल्याचे सांगितले.

         दिनांक 30 जानेवारीला संतांचे आगमन व महायज्ञ 31 जानेवारी सूर्योदयी घटस्थापना ध्वजारोहण संत वसंत बाबा यांचे हस्ते होईल व सकाळी 8.30 वाजता परमपूज्य गुरु माऊली वसंत बाबा बिंदवार यांचे आगमन व पूजन व गुरुमाऊलींचे मौलिक विचार दुपारी तीन ते सहा सद्गुरु माऊली वसंत बाबा बेंदवार व त्यांचे सहयोगी श्री विठ्ठलदास बाबा मेंढे यांची अमृतवाणी द्वारे हरिपाठ प्रवचन आरती व प्रसाद वितरित करण्यात येईल.

              सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत भोजन रात्री 9 वाजता पासून आलेल्या संतांचे देहशोधन या विषयावर कीर्तन होईल रविवार दिनांक 1फेब्रुवारी 2026 पहाटे चार वाजता काकड आरती हरिपाठ सकाळी 8 ते10वाजता सावरबंध संतनगरीतुन तालमृदुंगाच्या नादात संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात येईल दुपारी 12ते 2 वाजेपर्यंत गोपालकाला आरती व प्रसाद करण्यात येईल संपन्न दुपारी अडीच ते नऊ वाजता पर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल.

         रात्री साडेआठ वाजता भेटायचे कार्यक्रम होईल सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पहाटे चार वाजता गंगास्नान चुलबंद नदी तीरावर दुपारी 1 वाजता दुपारी 11 ते एक वाजता पर्यंत ब्रह्मलीन सद्गुरु वासुदेव बाबा देवगडे श्री संत यादव बाबा खेडीकर श्री संत विदेही मोतीराम बाबा व भीमा मातोश्री बिंदवार श्रीमती शांताबाई यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल दुपारी दोन ते पाच स्नेहभोजन व संत संमेलनाचा समारोप होईल.

         रात्री 8 वाजता उपदेशाचा कार्यक्रम होईल तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावरबंध तीर्थक्षेत्रातील प्रथम नागरिक सरपंच सौ माधवी भागवत बडवाईक, डाॅ अनिल शेंडे उपसरपंच आश्रमवासीश्री संत वसंत बाबा संत विठ्ठलदास बाबा मेंढे संत दोनडेबाबा भागवतजी बडवाईक, नंदुजी घोगरे सागरजी यादव गणेशजी सेरेकर चंदूची वडीकार निलेशजी राऊत यांनी केलेली आहे.