शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर येथे ध्वजारोहनाचा भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरपूर नगरीचे प्रथम नागरिक तथा ग्राम पंचायत शंकरपूरचे सरपंच श्री. साईश सतीश वारजुकर होते.
श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत शंकरपूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन पार पडले.या प्रसंगी ग्राम पंचायत शंकरपूरचे पदाधिकारी,(सदस्य व सदस्या) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये
सौ.सविताताई चौधरी,सौ. गीताताई रानडे,श्री.नितीन सावरकर,श्री.माजीद शेख,श्री.निखील गायकवाड,श्री.शंकर शेरकी,सौ.बेबीताई डहारे,सौ. सपनाताई घडसे,सौ.रंजनाताई उईके,सौ.वंदनाताई सहारे,श्रीमती यश्वकलाताई ढोक,सौ.शारदाताई गायकवाड (सदस्या,ग्राम पंचायत शंकरपूर) यांचा समावेश होता.
याचबरोबर श्री.रोशन ढोक माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर,सौ.भावनाताई बावनकर (माजी पंचायत समिती सदस्या) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग,शंकरपूर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,मान्यवर मंडळी,तसेच सर्व शाळांतील विद्यार्थी व गुरुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रम शांततामय,शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



