Home Maharashtra पोलीस पथसंचलनात साकोलीत जय हिंद मानवंदना… — बलाढ्य भारत नृत्यांवर झाला...

पोलीस पथसंचलनात साकोलीत जय हिंद मानवंदना… — बलाढ्य भारत नृत्यांवर झाला जल्लोष, सर्व शाळांची सदाबहार प्रस्तुती….

निलय झोडे 

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली : प्रजासत्ताक दिनी आज २६ जानेवारीला मध्यवर्ती साकोली होमगार्ड परेड मैदानावर तहसिलदार निलेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रसंगी पोलीस पथसंचलनात मानवंदना देण्यात आली. यात पोलीस ठाणे, होमगार्ड पथक, स्व. निर्धनराव वाघाये सैनिकी शाळा, एनसीसी कॅडेट यांंकडून पथसंचलन केले. 

         येथे जिल्हा परिषद हायस्कूल, नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय, जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ व २, कलाबाई कन्या विद्यालय, ॲकडमीक हाईट्स पब्लिक स्कूल, के. के. हायस्कूल, नंदलाल पाटील कापगते प्राथ. शाळा, ब्लॉसम इंग्रजी कॉन्व्हेंट अश्या विविध शाळांनी बलाढ्य भारतीय पराक्रम “ऑपरेशन सिंदूर” भारतीय थलसेना, जलसेना, वायुसेना यांच्या पराक्रमांची आकर्षक प्रस्तुती दिली. 

        मंचावर तहसिलदार निलेश कदम, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम इसापुरे, इंद्रायणी कापगते, नगराध्यक्षा देवश्री कापगते, प्रभाकर सपाटे, ना. तहसिलदार अरूणा देशभ्रतार, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, होमगार्ड समुपदेशक राजेश बैस यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. येथे संचालन क्रीडा शिक्षक शाहेद कुरैशी व एस. एस. लांजेवार यांनी केले.