Home Political दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तालुक्यातील सर्व उमेदवार...

दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तालुक्यातील सर्व उमेदवार जास्तीत जास्त मताने विजय करा :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील… — पवार साहेब व अजितदादा पवार एकत्र आल्याने विकास कामे अधिक गतीने होनार व सर्वच उमेदवार ही विजयी होतील :- संचालक आप्पासाहेब जगदाळे…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थान या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला.

            2026 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. 

           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे,आशोक घोगरे, प्रशांत पाटील, दत्तामामा घोगरे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर,सहित सर्व प्रत्येक गाव व भागातील कार्यकर्ते आणि मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली.

          याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत असताना म्हणाले की देशाचे नेते पवार साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विचाराने दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित करून इथून सर्व निवडणुका एकत्रितच होणार असल्याचे संकेत वरिष्ठांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आप्पासाहेब जगदाळे आशोक घोगरे व मला सांगितले म्हणूनच आम्ही गट तट बाजूला ठेवून इथून पुढे सर्व निवडणुका ताकतीने लढविणार व दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जोरावर इंदापूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून राहिलेली विकास कामे पूर्ण केली जातील. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रचाराचा प्रसंगी उद्गार..

            जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे बोलत आसताना म्हणाले की दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठाचा निर्णय आम्ही मान्य करून दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी ठरलेल्या आहेत इथून पुढे दोन्ही पक्ष एकत्रितपणे काम करणार पाठीमागील जे काय मतभेद असतील ते बाजूला सारून आम्ही सर्वजण एकत्र आलोय व कार्यकर्त्यांनी देखील सर्व मतभेद बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून सर्वच उमेदवार निवडून आणावेत जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे प्रचार प्रसंगी उद्गार.. 

             याप्रसंगी बावडा गट व लाखेवाडी गणातून हजारो कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बावडा लुमेवाडी गटाचे जिल्हा परिषद पदाच्या उमेदवार सौ. अंकिता पाटील ठाकरे, तसेच पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार शिवाजी विजयसिंह मोहिते पाटील, व सौ. धनश्री पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. मतदारांच्या भेटीगठी घेण्यास सुरुवात झाली.

          भागातील कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सतत पाठपुरावा करून प्रत्येक वाडी वस्तीवर मतदान जास्तीत जास्त घडवून आणण्याचा प्रयत्न करावा अशीही यावेळी सांगण्यात आले. उमेदवार अंकिता ताई पाटील, शिवाजीराव मोहिते, यांनीही आपले विचार व्यक्त करून उमेदवार म्हणून दिलेल्या संधीचे सोनं करून वरिष्ठांच्या मदतीने विकास कामे जास्तीत जास्त करण्याचे आमचे नेहमीच प्रयत्न राहतील. तसेच यावेळी गिरवी, टणु, पिंपरी बुद्रुक आदी भागात गाव भेट दौरा पूर्ण करून मतदारांना आव्हान केले.