रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी…
चिमूर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सन्मान स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर ग्रामपंचायतच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात प्रथम मुलीसाठी तीन हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात आले व त्याबाबतच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
श्री.ज्ञानेश्वर माऊली सभागृह किल्ला मंदिर येथे महिला मेळावा घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर हे होते तर उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझले यांच्यासह सह उद्घाटक म्हणून सरपंच साईश वारजूकर हे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणूनमाजी जिल्हा परिषद सदस्य गीता रानडे,माजी सरपंच सविता चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तद्वतच विशेष मार्गदर्शक म्हणून चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ता प्रज्ञा राजुरवाडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक,माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर,ग्रामपंचायत सदस्य बेबी डहारे,वंदना शहारे,रंजना उईके उपस्थित होते.
या महिला उपक्रमांतर्गत येथील महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आलाय.उपस्थित सर्व महिलाना ग्रामपंचायतच्या वतीने भेट वस्तू देण्यात आली.
तसेच या मेळाव्यात अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,आशा वर्कर व परिचारिका यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय.

महिला व बालकल्याण विभाग योजनेअंतर्गत ग्रामपंचायत उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम महिला विकासवर खर्च करण्यात येते.या योजने अंतर्गत डॉ.सतीश वारजूकर यांच्या संकल्पनेतून सन 2025 ते 26 या वर्षांत ज्यांच्या घरी प्रथम मुलगी जन्माला आली तिच्या नावाने 18 वर्षापर्यंत तीन हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात आले.यां योजनातंर्गत 25 लाभार्थी मुलींची निवड करण्यात आली.
त्या सर्वांना फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ढोक यांनी केले तर अमोद गौरकर यांनी प्रास्ताविक केले.सविता चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी केशव गजबे,कर्मचारी सादिक शेख,आकाश शामकुरे,विजय गजभिये,बाळा ढोक,रवींद्र राखडे,राम शेरकी, सचिन निकुरे,ममता डांगे,लता मडावी आदींनी परिश्रम घेतले.



