Home Social समस्या जनतेच्या, उत्तर नगरसेवकांचे… — वडाळा पैकू येथील पाण्याची टाकी का...

समस्या जनतेच्या, उत्तर नगरसेवकांचे… — वडाळा पैकू येथील पाण्याची टाकी का रिकामी?… — स्वीकृत सदस्य नगरसेवक सचिन फरकाडे यांनी तात्काळ दखल घेऊन केली पाहणी….

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

     चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या वडाळा येथील पाण्याची टाकी बांधकाम पूर्ण होऊन ही टाकी रिकामी आहे. जय लहरी नगर मध्ये रस्ते नाली बांधकाम झाले नाही.

         या बाबत सचिन खाडे यांनी नगरसेवक सचिन फरकाडे यांनी समस्या व्यक्त केली असता तात्काळ भाजपा चिमूर शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन फरकाडे यांनी घटना स्थळी पाहणी केली.

          न्यू राष्ट्रीय विद्यालय च्या मागे पाण्याची टाकी असून पाईप लाईन टाकली नसल्याने टाकीत पाणी भरणा होत नाही. पाईप लाईन टाकण्यासाठी फेरा मारून अतिरिक्त जास्त खर्च करण्यापेक्षा जय लहरी नगर मधील एक प्लॉट खरेदी केल्यास पाईप लाईन जवळच्या मेन लाईन ला जोडण्यात येऊ शकते.

        त्यामुळे प्रभाग १, २, ३ मध्ये पाणी पुरवठा सुलभतेने होऊ शकते. तो प्लॉट घेतल्यास दोन रस्त्याना जोडल्या जाऊ शकते त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना सुलभ होऊ शकते. सचिन खाडे यांचे घरा समोरून अजून ही रस्ता नाली बांधकाम झालेले नाही. त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

         प्रत्यक्ष नगरसेवक सचिन फरकाडे यांनी त्या रस्ता, प्लॉटची पाहणी केली. येणाऱ्या मिटिंग मध्ये विषय ठेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.