Home Social दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धरमकाट्यावर वजनात तफावत, शेतकऱ्याची तक्रार…

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धरमकाट्यावर वजनात तफावत, शेतकऱ्याची तक्रार…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरच्या धरम काट्यावर एका शेतकऱ्याने कापूस गाडी वजन करण्यासाठी नेली असता त्या काट्यावर संबंधित शेतकऱ्याचा कापूस कमी भरला उलट त्याच कापूस गाडीचे जिनींगमध्ये वजन केले असता ते जास्त भरले याबाबत संबंधित शेतकऱ्याने वरीष्ठाकडे तक्रार केली आहे. 

         दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल शेतकरी भिमराव विठ्ठल कुऱ्हाडे यांनी कापूस गाडीचे वजन बाजार समितीच्या धरम काट्यावर गाडीचे कापसासहीत वजन केले असता कापसा सहित 77 क्विंटल 85 किलो एवढे भरले नंतर तीच गाडी सदगुरु जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे सीसीआयला कापूस दिला असता गाडीचे कापसा सहीत वजन 78 क्विंटल 25 किलो भरले त्यामुळे कापसाचे गाडीचे वजन 40 किलोने कमी भरले नंतर तीच गाडी सदगुरु प्रेसिंग जिनिंग मध्ये 78 क्विंटल 25 किलोची गाडी खाली केल्यानंतर भरली 30 क्विंटल 35 किलो भरली.

         कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे धरम काट्यावर निव्वळ कापसाचे वजन 47 क्विंटल 65 किलो भरले आणि सदगुरु जिनिंग प्रेसिंग दर्यापूर मध्ये निवळ कापसाचे वजन 47 क्विंटल 90 किलो भरले. दुसऱ्या गाडीचे वजन धरम काटयावर कापसासहीत वजन 71 क्विंटल 14 किलो खाली गाडीचे वजन 30 क्विंटल 20 किलो भरले आणि कापसाचे निव्वळ वजन 41 क्विंटल 25 किलो तर सदगुरु जिनींग प्रेसिंग मध्ये कापसासह संपूर्ण गाडीचे वजन 71 क्विंटल 65 किलो खाली गाडीचे 30 क्विंटल 30 किलो आणि निव्वळ कापसाचे वजन 41 क्विंटल 35 किलो भरले.

         कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे शेतकऱ्यांचा घाम गाळून, मेहनत करून, कर्ज काढून पिकविलेला कापूस खरेदी केला जातो. येथे वजन करण्यासाठी दोन धरम काटे असून दोन पैकी कोणता धरम काटा खरा व कोणता खोटा समजायचा असा प्रश्न निर्माण होतो.

        या धरमकाट्यावर व इतर प्रशासकीय यंत्रणेवर संचालक मंडळाचे लक्ष आहे काय?

        किंवा संचालक मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नेमका कोणाचा फायदा करतो हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्या होणाऱ्या नुकसानास जबाबदार कोण? या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून शेतकरी व व्यापारी यांची होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबतची तक्रार सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव,तहसिलदार दर्यापूर व ठाणेदार यांच्याकडे भिमराव कुऱ्हाडे यांनी केली आहे.