बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
गोंदी तालुका इंदापूर येथील कैलासवासी महादेव नारायण डांगे यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त ह भ प रामभाऊ अभंग महाराज यांची कीर्तन सेवा भक्तिभावाने टाळ आणि मृदगाच्या गजरात झाली.
या प्रसंगी परिसरातील पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गोंदी, ओझरे, लवंग, बावडा, गारअकुले, टाकळी, टणु, आधी सर्व भागातील टाळकरी, मृदंग वादक,भाविक भक्त, वारकरी सहीत गोंदी गावचे विद्यमान सरपंच रंजीत वाघमोडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. रामभाऊ अभंग महाराज यांनी आपल्या कीर्तनातून संतविचार, मानवतेचा संदेश आणि नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. परमार्थ करीत असताना मनुष्याने जीवनात एक तरी आषाढी वारीचा सोहळा पूर्ण करावा, म्हणजे जीवनात सुख आणि समाधान होऊन प्रापंचिक प्रगती होत आसते हेच भाग्याचे लक्षण. ह भ प रामभाऊ अभंग महाराज यांचे गोंदी येथील कीर्तन सेवे प्रसंगी उद्गार…
रामभाऊ अभंग महाराज यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनादरम्यान “हरिनामाचा गजर” आणि अभंगांनी संपूर्ण गोंदी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या पुण्यस्मरण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गोंदी गावचे प्रगतशील बागायतदार ह भ प शहाजी महादेव डांगे,गणेश शहाजी डांगे, सचिन शहाजी डांगे, ह भ प गजानन डांगे महाराज सर्व कुटुंबीय व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. किर्तन सेवे प्रसंगी आलेले भाविक भक्त व ग्रामस्थ यांचे गणेश शहाजी डांगे यांनी आभार व्यक्त केले.



