Home Social रा.तू महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

रा.तू महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

     चिमूर/- स्थानिक गाँधी सेवा शिक्षणं स्मिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थी विकास विभाग,राष्ट्रीय सेवा योजना,रेड रिबन क्लब द्वारे उत्साहात साजरी करण्यात आली.

       भारताच्या इतिहासातील व्यक्तिमत्त्वांच्या जीवन व शिकवणीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने तसेच युवा दिनाचे औचीत्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

         कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य डॉ.पितांबर पिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

      त्यांनी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजाना घडविण्यात राजमाता जिजाऊ यांच्या कामगिरीचे कौतुक केले.स्वामी विवेकानंदांचा तरुणांना दिलेला त्यांचा संदेश आजच्या युवा दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्यानी आत्मसात केला पाहीजे असे प्रतिपादन केले.

       प्रमुख वक्ते म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे होते.त्यांनी सांगितले की,राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची यांची राष्ट्रनिर्मितीत महत्वाचे स्थान आहे.राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील नजरबंदीत असताना राज्यकारभार साभांळला.

        विवेकानंदाचे “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” हे प्रेरणादायी वाक्य विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात जीवनात आत्मसात केले पाहीजे असे विशद केले.

        कार्यक्रमाला मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.कार्तिक पाटील,प्रा.डॉ.राहागंडाले,प्रा.डॉ. कामडी,प्रा.वर्षा सोनटक्के,प्रा. निखिल पिसे,प्रा.चेतन चौधरी उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ.नितिन कत्रोजवार यांनी केले.आभार प्रा.डॉ. आशुतोष पोपटे यांनी केले.विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमासाठी उदंड प्रतिसाद होता.राष्ट्रगितानी कार्यक्रमाची सांगता झाली.