Home Social आदीवासी आश्रम शाळा पळसगांव येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची...

आदीवासी आश्रम शाळा पळसगांव येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

           चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव येथील आदिवासी आश्रम शाळा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

       कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुमन पिंपळापुरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे कृष्णा तपासे यांनी “उठा,जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका”,असे विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले.

          प्रमुख पाहुणे म्हणून पळसगांवच्या सरपच्या सरीता गुरुनुले यांनी विद्यार्थ्यांना श्रम मेहनत आणि संस्कार आत्मसात करावे यांवर आधारित मार्गदर्शन केले.

        सूत्रसंचालन विलास बोरकर शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल कामठी यांनी केले.प्रस्तावना मुख्यध्यापक मंगेश बोरकर यांनी मांडली.

         तसेच दुपारी २ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.श्रेष्ठ कलाकारांवर बक्षिसांचा चांगलाच पाऊस पडला.

       सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शाळेचे शिक्षक जयदेव रेवतकर,तसेच एकनाथ मडावी यांनी खूप मेहनत घेतली आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करून दाखविला.पालक वर्ग तसेच गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.