Home Social भाग्यलक्ष्मी उत्पादक गट यांचा अभिनव उपक्रम… — दोन दिवसात ५१० किलो...

भाग्यलक्ष्मी उत्पादक गट यांचा अभिनव उपक्रम… — दोन दिवसात ५१० किलो मुरमुरा विक्री… 

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

चिमूर :- दि. 13/01/2026 ला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत भाग्यलक्ष्मी उत्पादक गट बोथली (वहा.) यांचे वतीने तिळ संक्रांत निमित्ताने मुरमुरा मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आला.

             कमी गुंतवणुकीत चांगल्या उत्पन्नाची संधी स्थानिक पातळीवर चांगला नावलौकिक मिळवलेला मुरमुरा उत्पादन व विक्री व्यवसाय सध्या विक्रीस उपलब्ध करण्यात आला आहे. मागील वर्षांपासून सातत्याने चालू असलेला हा व्यवसाय कमी खर्चात स्थिर उत्पन्न देणारा ठरला आहे.

         या व्यवसायामध्ये आवश्यक यंत्रसामग्री भाग्यलक्ष्मी उत्पादक गटाकडे उपलब्ध आहे. किराणा दुकाने, हॉटेल्स, चाट सेंटर तसेच घाऊक विक्रीसाठी या मुरमुराला चांगली मागणी आहे.

             सध्याच्या काळात अल्प गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे तरुणांचा कल वाढत असताना, चालू अवस्थेतील हा मुरमुरा व्यवसाय खरेदी करून त्वरित उत्पन्न सुरू करता येऊ शकते. व्यवसाय विक्रीचे कारण सामूहिक असल्याचे भाग्यलक्ष्मी उत्पादक गट सदस्यांनी सांगितले आहे.

         इच्छुक खरेदीदारांनी अधिक माहितीसाठी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

         सदर व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, चिमूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.