Home Social शाळेतील संस्कृती व कायमची मैत्री अशीच विद्यार्थ्यांनी जोपासावी :- संचालक श्रीकांत बोडके.....

शाळेतील संस्कृती व कायमची मैत्री अशीच विद्यार्थ्यांनी जोपासावी :- संचालक श्रीकांत बोडके.. — लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांची जीवाभावाची मैत्री – एकाच ताटात भाताचा आस्वाद घेताना….

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

     पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांन मधील जिव्हाळ्याचे आणि आदर्शवत मैत्रीचे चित्र पाहायला मिळाले. शाळेच्या मध्यान्ह भोजनावेळी काही लहान विद्यार्थी एकत्र बसून एकाच ताटात शाळेतील भाताचा आस्वाद घेताना दिसले. या दृश्यामुळे विद्यालयतील आपुलकी, समता आणि बंधुभाव अधोरेखित झाला आहे.

        पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्राम स्थ यांच्याही वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. अशीच संस्कृती कायमस्वरूपी विद्यार्थ्यांनी जोपासवी विद्यार्थ्यांच्या मैत्रीकडे पाहताना संचालक श्रीकांत बोडके यांचे यावेळी उद्गार…

       आजच्या स्पर्धात्मक युगातही विद्यार्थ्यांमधील निखळ मैत्री, एकमेकांन बद्दलची काळजी आणि वाटून खाण्याची संस्कृती जपली जात असल्याचे या प्रसंगातून लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयात स्पष्ट पहावयास मिळालेले दिसत आहे. शिक्षकांनीही या कृतीचे कौतुक करत, अशा मूल्यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत विद्यालयाचे प्राचार्य भरत कोरटकर सर यांनी यावेळी व्यक्त केले.

       पालक आणि ग्रामस्थांनी सुद्धा या घटनेचे स्वागत करत, शाळा केवळ शिक्षणाचेच नव्हे तर संस्कारांचेही केंद्र असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांची ही जीवाभावाची मैत्री इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.