ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – चूल आणि मूल यापर्यंत सीमित न राहता महिलांनी उच्च विद्याविभूषित शिक्षण घेऊन समाज जागृती करावी आणि समाजात संस्कारमाय उपक्रम राबवावीत असे प्रतिपादन जयकुमार मेश्राम यांनी केले.
ते भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरी च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमातून अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानी भावना बारसागडे, डॉ. कविता खोब्रागडे, अमरदीप मेश्राम ,राजू बारसागडे भागवत मेश्राम, विनोद कोहपरे,अनिल ठवरे ,कल्पना ठवरे आदी उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने एकच नृत्य स्पर्धा व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन केलेले होते यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली सहकार्य सहभाग दर्शवला व उस्फूर्तपणे हा कार्यक्रम संपन्न झाला.
एकल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम स्नेहा खांडेकर, द्वितीय श्रेयशा बांबोळे तर ग्रुप डान्स मध्ये प्रथम भिमकन्या ग्रुप ,द्वितीय सावित्री ग्रुप व तृतीय संघमित्रा ग्रुप सोबत ग्रुप तर्फे सुंदर अशा नाटिकेचे आयोजन केलेले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती मेश्राम यांनी केले.
प्रस्ताविक कुमता मेश्राम तर आभार अनुराधा रामटेके यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण बांबोडे ,शामिना मेश्राम, पुष्पा रामटेके ,कुंदा झाडे, सुलभा बोरकर, दीक्षा धोगळे ,सुशीला कोलटकर , लता बारसागडे, दुर्गा मेश्राम, हेमलता ठवरे, बबीता शहारे, इंदु भैसारे,सुचित्रा रामटेके आणि हुमनेताई यांनी अथक परिश्रम घेतले.



