Home Political महानगरपालिका निवडणूकींचे महत्व…

महानगरपालिका निवडणूकींचे महत्व…

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक.. 

     महानगरपालिका हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे एक स्वरूप असून,शहरातील पाणीपुरवठा,स्वच्छता,आरोग्य,शिक्षण,रस्ते आणि नगर नियोजन यांसारखी कामे महानगरपालिकेच्या विविध विभागाद्वारे केली जातात.

       यात विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक (Corporators) निवडले जातात,जे निवडून आल्यावर पक्षीय राजकारणासोबतच त्यांच्या वॉर्डातील आणि शहराच्या विकासासाठी काम करतात.

       महापौर,उपमहापौर आणि नगरसेवक हे महानगरांच्या विकासात व महानगरातंर्गत नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.यामुळे महानगरपालिकांच्या निवडणूका अतिशय महत्त्वाच्या असतात.

महानगरपालिकेची कार्ये….

        शहरी नियोजन, (Urban Planning): शहराचा विकास आणि बांधकामांचे नियमन करणे.नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे.कचरा व्यवस्थापन,रस्ते आणि गटारे यांची स्वच्छता राखणे.प्राथमिक शाळा चालवणे.रस्ते,पूल आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करणे.मालमत्ता कर आणि इतर स्थानिक कर गोळा करणे. 

          थोडक्यात,महानगरपालिका ही शहराच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी जबाबदार असते,ज्यात अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (नगरसेवक) निवडून येऊन आपापल्या पक्षाच्या धोरणांनुसार आणि शहराच्या हितासाठी काम करतात…