Home Social सामाजिक कार्यकर्ते शरद आठवले यांच्या हस्ते दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान…

सामाजिक कार्यकर्ते शरद आठवले यांच्या हस्ते दर्यापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

        मराठी पत्रकारीतेची पायाभरणी करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा सांगळूद ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद आठवले यांनी 6 जानेवारीला दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विश्राम गृह दर्यापूर, येथे तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करुन सत्कार केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टोबरे यांच्याकडूनही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

        त्यावेळी गजानन देशमुख, बबनराव शिरभाते, लक्ष्मण जाधव, हरिदास खडे, शशांक देशपांडे, गजानन चौरपगार,युवराज डोंगरे, नावेद सय्यद,शिलवंत रायबोले,अमोल कंटाळे,रवि नवलकार, अनिल तायडे, महेश बुंदे, मोहन खरबडकर, आदेश खांडेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अनिल गवई, पॉलेंन्द्र ढोके सतिश जामनिक उपस्थित होते.