Home Social वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा व नवनियुक्त नगरसेवक बाळू...

वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा व नवनियुक्त नगरसेवक बाळू भाऊ टेंभुर्णे यांचा सत्कार समारंभ उत्साहात…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

         वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त नगरसेवक बाळु भाऊ टेंभुर्णे यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

        यावेळी नवनियुक्त नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नवनियुक्त नगरसेवक बाळु भाऊ टेंभुर्णे यांनी आपल्या भाषणात जनतेने दिलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, शहरातील मूलभूत प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण व आरोग्य या विषयांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले.

         कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक प्रा.हितेश मडावी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “वंचित, उपेक्षित व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत प्रभावीपणे मांडणे हीच वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे.” नवनियुक्त नगरसेवकांकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         तसेच येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भाने चर्चा करण्यात आली. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी रणनीती आखता येईल यावर प्रमुख मार्गदर्शकांनी सविस्तर चर्चा घडवून आनली.

         समारंभाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षाची ताकद दाखवून दिली. सदर सत्कार समारंभामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

         या सत्कार समारंभाला वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे ,जिल्हा महासचिव मंगलदास चापले ,जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ जी दुधे ,निवडणूक निरीक्षक जी.के. बारसिंगे ,जेष्ठ नेते सीताराम जी टेंभुर्णे ,सोनलदिप देवतळे, देवानंद जी दुर्गे, रामटेके साहेब ,विलास जी केळझरकर ,हजारे साहेब, कवडू भाऊ दुधे , महिला नेत्या जया रामटेके, उषाताई निमगडे, सुरेखाताई बारसागडे मॅडम, जगदीश दामले, दामले मॅडम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.