Home देशविदेश विषमता आणि समता : उत्पती आणि व्यवस्था…

विषमता आणि समता : उत्पती आणि व्यवस्था…

    जी समाज व्यवस्था असते त्या समाज व्यवस्थेत माणूस आपले जीवन व्यथित करीत असतो.

   समाज व्यवस्था दोन प्रकारची असते.1 विषमतावादी समाज व्यवस्था,म्हणजे विषमतेची व्यवस्था,परिस्थिती,वातावरण.2 समतावादी व्यवस्था,म्हणजे समतेची अवस्था,परिस्थितीआणी वातावरण.

    विषमतेच्या विचारातून विषमता निर्माण होते आणि समतेच्या विचारातून समता निर्माण होते.त्यानुसार व्यवस्था,व्यवस्था जशी तशी अवस्था आणि वातावरण असते किंवा निर्माण होते.

    माणसाच्या मनात हे विषमतेचे किंवा समतेचे विचार कुठून येतात हे आपण पाहू या.

   समतेची किंवा विषमतेचे विचार माणसाच्या बुद्धीत किंवा भावनेत किंवा मनात दोन प्रकारे येतात, म्हणजेच विचाराची माध्यमे दोन आहेत.1 नैसर्गिक ( स्वाभाविक ) 2 भौतिक ( व्यवस्थेतून ).

   निसर्गतः माणसात सदगुण आणि दुर्गुण असतात, अर्थात माणूस ज्या व्यवस्थेत राहत असतो किंवा ज्या परिस्थितीत किंवा अवस्थेत किंवा त्या वातावरणात राहत असतो त्याचा परिणाम त्या सद्गुणावर आणि दुर्गुणावर होत असतो. विषमतेच्या व्यवस्थेत किंवा विषमतेच्या वातावरणामध्ये दुर्गुणांना अधिक संधी मिळते, ते अधिक प्रभावी होतात, ते आक्रमक पण बनतात. याउलट सदगुणांचे आहे. म्हणजेच समतेच्या व्यवस्थेत सदगुण प्रभावी होतात,दुर्गुण दुर्बल असतात. विषमतेच्या व्यवस्थेत किंवा विषमतेच्या परिस्थितीमध्ये सदगुण निस्तेज असतात.अर्थात विषमतेच्या व्यवस्थेत सदगुणांची जर मशागत केली तर ते प्रभावी ठरवून विषमतेची व्यवस्था नष्ट करू शकतात. संस्कार म्हणजे मशागत होय. सदगुणांचे संस्कार म्हणजे संस्कृती होय, आणि दुर्गुणाचे संस्कार किंवा दुर्गुणांची मशागत म्हणजेच विकृती होय. सद्गुण म्हणजे संस्कृती आणि दुर्गुण म्हणजेच विकृती होय. 

    विषमतावादी व्यवस्थेत किंवा विषमतावादी वातावरणात सदगुणांची मशागत करणे किंवा सद्गुरुणाचे संस्कार करणे अवघड जाते, पण तसे संस्कार करता येतात, त्यासाठी दृढ निश्चय आणि सातत्य पाहिजे. समतेच्या विचारावर निष्ठा आणि श्रद्धा हवी आहे. तरच प्रत्येकाच्या विचारात समतेचे डीजे रोवल्या जातील, समतेच्या विचाराचे संस्कार होतील, म्हणजेच सद्गुणांची मशागत होईल, सदगुणांना बळ येईल, त्यामुळे विषमतेचे वातावरण नष्ट होण्यास मदत होईल. 

    माणसातील दुर्गुण म्हणजेच विकृती होय, दुर्गुण म्हणजे अहंकार अभिमान द्वेष मत्सर राग अति लोभ,मत्सर, मान,कपट,इत्यादी. खरे तर माणसातील दुर्गम हे माणसाचे शत्रूच असतात, परंतु तेच माणसाला आपले मित्र वाटतात, म्हणून ज्या माणसांमध्ये दुर्गुणाचा प्रभाव अधिक असतो, अशी माणसे विषमतावादी व्यवस्थेचा पुरस्कार करतात आणि अशी व्यवस्था टिकून राहण्याचा प्रयत्न करीत असतात, अशी माणसे हुकूमशाही प्रवृत्तीचे असतात, निर्दय असतात, हिंसक असतात. अति स्वार्थी आणि अति लोभी असतात, ते स्वतःचा आणि आपल्या कुटुंबापुरताच विचार करीत असतात, अशी स्वार्थी माणसे हे वंशवादी, जातीवादी आणि धर्मवादी आणि धर्मांध असतात. ही विषमतावादी माणसे समतावादी माणसांना विरोध करीत असतात. समतावादी माणसे म्हणजेच सद्गुनी माणसे, प्रज्ञा शील करुणा, सत्य न्याय नीती, दया क्षमा शांती, स्वातंत्र्य बंधुता समता, या विचाराची माणसे ही समतावादी माणसे असतात, अशी माणसे समतेचे वातावरण समतेची व्यवस्था आणि अवस्था निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. 

     ” सत्यमेव जयते ” कधी ना कधी सत्याचाच विजय होत असतो. समता हेच सत्य आहे आणि विषमता हेच असत्य आहे. विषमता म्हणजे भ्रम होय. कल्पना होय. काल्पनिक गोष्टी या टिकाऊ नसतात. सत्य गोष्टी या टिकाऊ असतात. सत्य प्रस्थापित व्हायला अडचणी येतात किंवा त्यास वेळ लागतो, परंतु कधी ना कधी सत्याची प्रस्थापना होणार हे नक्कीच असते. तो एक निसर्ग न्यायच असतो. 

    जी माणसे विकृत असतात, म्हणजे जी माणसे दुर्गुणी असतात, ते अहंकारी असतात, म्हणून ते वाया जातात, आणि त्यांचे विचार आणि आजच्या म्हणजे व्यवहार पण वाया जात असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले ” अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला “. विषमतेची व्यवस्था जपणारे अनेक राज्यांची राज्ये नष्ट झाली,होतात तिथे दुसरे राज्य ( जो राजा न्यायी आहे ) स्थापन झाले,त्या राज्याची शास्त्रबळ कमी पडले की ,एखाद्या दुर्गुणी राजाचे राज्य स्थापन झाले,असा विषमतेचा इतिहास आहे.परंतु जगातील प्रत्येक देशात समतावादी व्यवस्था म्हणजे आर्थिक आणि सामाजिक समता स्थापन झाली तर जगातील विषमता नष्ट होईल.माणसातील दुर्गुणांना संधी मिळणार नाही,सद्गुणांना बळ मिळेल,त्यामुळे विषमतावादी विचार दबून बसतील.तरी दडी मारून बसलेले विषमतेचे विचार समतेच्या व्यवस्थेत त्यांना संधी मिळाली तर परत ते विषमतेची व्यवस्था निर्माण करू शकतात,यासाठी त्यांना संधीच मिळणार नाही,असे संविधान ,कायदे,वातावरण असणे जरुरीचे आहे.

   आज साऱ्या जगात समतावादी सद्गुणी विचारांना संधीच मिळणार नाही,अशा प्रकारचे प्रयत्न विषमतावादी लोकांकडून होताना दिसताहेत.या व्यवस्थेत हे असे होणारच,यात आश्चर्य किंवा दुःख मानायचे कारण नाही.

    सत्ता किंवा सरकार हे व्यवस्था सांभाळण्याचे टिकविण्याचे काम करीत असते,म्हणून जी व्यवस्था त्याच व्यवस्थेचे सरकार ( सत्ता ) असते. म्हणजेच जर विषमतेची व्यवस्था असेल तर सरकार पण विषमतेचेच असणार म्हणजेच विषमतेची व्यवस्था टिकविणे तिची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य ठरते किंवा असते, आणि जर समतेची व्यवस्था असेल तर त्या व्यवस्थेचे सरकार किंवा सत्ता पण समतेची व्यवस्था टिकविणे किंवा त्या व्यवस्थित काळजी घेण्याची काम करीत असते, थोडक्यात काय तर जशी व्यवस्था तशी सत्ता. सरकार बदलणे किंवा सत्ता बदलणे म्हणजे व्यवस्था बदलणे असे नाही. याउलट व्यवस्था बदलणे म्हणजे सत्ता बदलणे असे आहे. व्यवस्था बदलली की आपोआप सत्तापन बदलते, परंतु काही वेळा षडयंत्र करून सत्ता बदलते परंतु ती बदललेली सत्ता किंवा ते सरकार कोणत्या व्यवस्थेचे समर्थन करते यावर व्यवस्था कोणती येईल किंवा राहील ते अवलंबून असते, समजा विषमतावादी व्यवस्थेतून समता वाद्यांची सत्ता आली तर ती सत्ता किंवा त्या सत्तेतील मंत्रिमंडळ किंवा बहुसंख्येने खासदार जर समाजवादी विचाराचे असतील तर ते समाजवादी व्यवस्था निर्माण करू शकतात, राज्यघटना जर समतावादी असेल तर तिची शंभर टक्के अंमलबजावणी करू शकतात. परंतु जर समजा राज्यघटना म्हणजेच संविधान जर हे समाजवादी किंवा समतावादी विचाराचे असेल आणि निवडून जाणारे 51% आमदार खासदार जर विषमतावादी विचाराचे असतील तर ते विषमतावादी व्यवस्थाच मजबूत करण्याचे काम करतील, त्यांच्यातील एखाद्या हुकूमशाला पण ते पाठिंबा देतील. याचा अर्थ निवडून जाणारे लोक जर 52% असतील आणि ते कोणत्या विचाराचे आहेत म्हणजेच ते विषमतावादी विचाराचे आहेत की समतावादी विचाराचे आहेत यावर व्यवस्था अवलंबून असते, संविधान ज्या समाजवादी किंवा समतावादी असेल आणि निवडून जाणारे बहुसंख्येने जर विषमतावादी असतील तर त्या संविधानाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, उलट ते संविधानच बदलून टाकण्याचे षडयंत्र होत असते, आणि जनतेने जर समाजवादी किंवा समतावादी विचाराच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले तर मात्र अशा समाजवादी समतावादी संविधानाची अंमलबजावणी होऊ शकते यात तीळ मात्र संशय नाही. परंतु यासाठी जनता प्रगल्भ विचाराची पाहिजे. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मतदान न करणारी पाहिजे, तरच हे शक्य आहे. 

      आपल्या देशात लोकशाही स्थापन झाली समाजवादी संविधान जनतेला मिळाले, परंतु समता म्हणजे काय? विषमता म्हणजे काय ? त्यांचे चांगले वाईट परिणाम काय? भारतीय संविधान हे कसे समाजवादी आहे? लोकशाहीचे महत्त्व काय? यासंबंधीचे जनजागरण या 50 वर्षात तरी भरपूर व्हायला पाहिजे होते ते मुळीच झाले नाही, म्हणून आज भारतीय जनता अनेक प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडून मतदान करीत आहेत, याचा अर्थ मत मताचे महत्त्व आणि मताचा परिणाम आणि लोकशाहीतील मतदान आणि स्वतःची जीवन याचा कसा जवळचा संबंध आहे हेच अजून अशिक्षितांना तर जाऊ द्याच परंतु शिकलेल्यांना नवे प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर लोकांना सुद्धा समजलेले नाही, म्हणून सुशिक्षित काय किंवा अडाणी काय सगळेच प्रलोभनाला बळी पडून मतदान करीत आहेत, अर्थात विषमतावादी विचाराचे लोक हे विषमतावादी सरकारला किंवा अप्रतिनिधींना मतदान करणारच यात शंकाच नाही, परंतु विषमतावादी विचार ज्यांचे नाहीत असे लोक जेव्हा असे मतदान करतात तेव्हा गंभीरपणे यावर विचार करणे हे शहाणपणाचे ठरते, नवे सुज्ञ आणि विचारवंतांचे हे कर्तव्यच ठरते. 

    आपल्या देशात समाजवादी व्यवस्था आणायला फार अडचणीचे नाही, कारण आपले संविधानच समाजवादी विचाराचे आहे, तशी कायद्याची तरतूद पण संविधानामध्ये आहे, फक्त अडचण आहे की संविधान वादी लोकप्रतिनिधी सरकार मध्ये निवडून गेले पाहिजेत. तरच विषमतावादी व्यवस्था नष्ट होऊन समतावादी व्यवस्था आपल्या देशात स्थापन होईल, नक्कीच वेळ लागेल पण अशी व्यवस्था येईलच, यावर आपला आधी विश्वास पाहिजे आणि निष्ठा पाहिजे. आणि प्रयत्न केले पाहिजेत, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे, अशक्य ते शक्य करिता सायास तुका म्हणे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, माननीय नाही बहुमता. या तुकाराम महाराजांच्या उपदेशानुसार व मार्गदर्शन नुसार जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच परिवर्तन बदल क्रांती होणार यात शंकाच नाही. आज समतावादी विचाराचे आपण लोक अल्पमता जरी असलो, विषमता व त्यांचे बहुमत जरी असले, तरी त्या बहुमतावर आपण विश्वास ठेवता कामा नये, मानिले नाही बहुमता, असा दृढ निश्चय करून विषमतावादी व्यवस्था नष्ट करण्याचा नव्हे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करूया. पुरोगामी परिवर्तनवादी क्रांतिकारी विचारांची कास धरूया. 

       लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

   दिनांक : 4 जानेवारी 2026, फोन : 9420912209.