Home Social शामानंद हायस्कूल महालगाव येथे बालिका दिन साजरा…

शामानंद हायस्कूल महालगाव येथे बालिका दिन साजरा…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

 दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. शामानंद हायस्कूल महालगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून साजरी करण्यात आली.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के डी लांजेवार, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री एल सी रामटेके श्री के एन लांजेवार, श्री एस बी मांढा ळकर, श्री बी बी चुटे, व कुमारी भुते होते.

        मी सावित्री बोलते या एकपात्री अभिनयातून कुमारी खुशी भेंडारकर व कुमारी रावी ब्राह्मणकर यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या कष्टाची व परिश्रमाची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गीत आणि भाषणाच्या माध्यमातून सावित्रीबाई यांच्या कार्याचा परिचय करून दिला. विद्यालयातील स्त्री शिक्षिका कुमारी भुते यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

         तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री के डी लांजेवार यांनी सावित्रीबाईंनी पेटवलेल्या ज्ञानाच्या ज्योतीला अखंड तेवत ठेवण्याची गरज असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.

       कार्यक्रमाचे संचालन कुमारी वैष्णवी मेंढे तर आभार प्रदर्शन कुमारी नंदिनी लांजेवार हीने केले.