बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नीरा नरसिंहपूरचे माजी सरपंच शिवसेना उपजिल्हा प्रमुख आण्णासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तर नियुक्तीचे पत्र विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते देण्यात येतील तसेच धनुष्यबाण या चिन्हावरही सर्व निवडणुका लढविणार असल्याचेही उपजिल्हा प्रमुख आण्णासाहेब काळे यांनी सांगितले.
बैठकीच्या अनुषंगाने इंदापूर येथे लवकरच एकनाथ शिंदे साहेब शिवसेना या कार्यालयाची स्थापना करून कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी तालुक्यातील शिवसेना युवा सेना व सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन शिवसेनेचा पक्ष तालुक्यात वाढविण्यासाठी इथून पुढे कार्यकर्ते चांगलेच कामाला लागलेले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकी मध्ये शिवसेना पक्ष सर्व जागांवर निवडणूक लढविणार आसल्याने उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या नावाची यादीही बैठकीत करण्यात आली.
नरसिंहपूरचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब काळे यांना युवा सेना जिल्हा प्रमुख पुणे तसेच शुभम जामदार यांना शिंदे गट युवा सेना तालुका अध्यक्षपदी यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारस देण्यात आलेली आहे.
इंदापूर तालुक्यातील शिवसेना व युवासेना रिक्त पदावर लवकरच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. झालेल्या प्रमुख बैठकीत शिवसेनेने एकला चलो रे हा नारा देण्यात आलेला आहे.
लोकसभा विधानसभा नगरपरिषद या निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षाचा मदतीसाठी वापर करून घेतलेला आहे.
फक्त निवडणुकीबद्दल हा पक्ष तालुक्यातील शिवसेनेला विचारात घेतो इतर वेळी कुठलीही विकास निधीबाबत अन्यथा शिवसेनेचा विचार केलेला नाही अथवा मान सन्मान दिलेला नाही. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी यापुढेही आपला योग्य विचार करतील याची शिवसेनेला खात्री आहे. तालुक्यात शिवसेना यापुढे स्वबळावर येणाऱ्या सर्व निवडणूका स्वतंत्र लढविणार आहे. यावेळी शिवसेना युवा सेना सहित सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब काळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.



