दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड झालेल्या प्रशांत कुऱ्हाडे यांचा पदग्रहण सोहळा सोमवारी (दि.०५) पार पडणार आहे. नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात सायं चार वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना प्रशांत कुऱ्हाडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, तसेच भाविक व नागरिकांच्या सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पदग्रहण सोहळ्यास आजी माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व आळंदीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशांत कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली आळंदी शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



