Home Maharashtra सावकारी पाशात शेतकरी अडकले,नागभीडच्या घटनेनंतर चिमूर तालुक्यात रिपब्लिकन सेना आक्रमक…

सावकारी पाशात शेतकरी अडकले,नागभीडच्या घटनेनंतर चिमूर तालुक्यात रिपब्लिकन सेना आक्रमक…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

   शुभम गजभिये 

      विशेष प्रतिनिधी 

       नागभीड तालुक्यातील मिंतूर येथील एका शेतकऱ्याला सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची दुर्दैवी वेळ आली.या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून,याचे पडसाद आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटू लागले आहेत.या अमानवीय घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची व्यथा आणि सावकारीचा विळखा…

       मिंतूर येथील घटनेने हे स्पष्ट केले आहे की,ग्रामीण भागात आजही बेकायदेशीर सावकारीचे जाळे किती खोलवर पसरलेले आहे.कर्जाच्या विळख्यातून सुटका होत नसल्याने शेतकऱ्यांना किडनी विकण्यासाठी टोकाचे पाऊल उचलवे लागत आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

 रिपब्लिकन सेनेचे आवाहन….

         नागभीडप्रमाणेच चिमूर तालुक्यातही अनेक ठिकाणी अवैध सावकारी फोफावली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे चिमूर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी शेतकऱ्यांना धीर देत आवाहन केले आहे.

     शेतकऱ्यांनी कोणत्याही सावकाराला घाबरू नये,जर कोणी सावकार तुम्हाला मानसिक त्रास देत असेल किंवा जमिनीचे कागदपत्रे हडपले असतील,तर तात्काळ रिपब्लिकन सेनेशी संपर्क साधावा. 

      आम्ही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे जगदीश मेश्राम,तालुका अध्यक्ष,रिपब्लिकन सेना यांनी म्हटले आहे.

 मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन…

       चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या सावकारी त्रासाचा सामना करावा लागत आहे,त्यांनी आपली तक्रार किंवा माहिती खालील क्रमांकावर द्यावी:

संपर्क क्रमांक : ९३७०२९७५४१ (9370297541)

          अशा अवैध सावकारांवर कठोर कारवाई होईपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील.तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा किंवा अवयव विक्रीसारखा टोकाचा विचार न करता संघटित होऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागावी,असे आवाहन रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले आहे.