ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, : सिरोंचा येथे ०६.०१.२०२६ ते दिनांक ०७.०१.२०२६ या कालावधीत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स यात्रा साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांत जिल्हयात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ०६.०१.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक २०.०१.२०२६ चे २४.०० वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) लागू होणेस विनंती केलेली आहे.
त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक ०६.०१.२०२६ चे ००.०१वा. ते दिनांक २०.०१.२०२६ चे २४.०० वा. पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टीना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता वास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक ०६.०१.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक २०.०१.२०२६ चे २४.०० वा. पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश दिनांक ०६.०१.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक २०.०१.२०२६ चे २४.०० वा. वाजेपावेतो संपूर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, अविश्यांत पंडा यांनी आदेशीत केले आहे.



