1.बालपणी झाडावरील चिमणीची अंडी खाऊ इच्छिणाऱ्या सापास दगड फेकून खाली पाडले.
2.शाळा नसल्यामुळे पतीकडून घरीच शिक्षण घेतले.
3.अस्पृश्यांसाठी अंगणातील विहीर खुली करण्यास पतीला साथ दिली.
4.स्वतःचे घरास ” कुमारीमाता प्रसूतिगृह ” अशी पाटी लावून स्वतः बाळंतपण केले
5.न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि केशवपनाची रूढी बंद केली.
6.मयत पतीसोबत सती जाण्याची प्रथा बंद केली.
7.दुष्काळात आपल्या घरी स्वयंपाक करून लोकांना जेऊ घातले.
8.1848 ला मुलींची पहिली शाळा काढली.पहिली महिला शिक्षिका,मुख्याध्यापिका, आणि प्रशिक्षित शिक्षिका.
9.विनयभंग करणाऱ्याच्या मुस्कटावर मारणारी धैर्यशील शालीन महिला.
10.अनाथाश्रम चालविले,अनैतिक संबंधातून फेकून दिलेल्या अर्भकांची आई म्हणून काम केले.
11.पतीच्या प्रत्येक समाज कार्यात सहयोगिनीचे काम केले.
12.निपुत्रिक असल्याचे कधीच दुःख केले नाही.
13.अनैतिक संबंधातून झालेल्या मुलास दत्तक घेऊन त्यास शिक्षण देऊन डॉक्टर केले.
13.जनसेवेसाठी यशवंत पुत्रास दवाखाना चालवायला सांगितले.
15.ज्योतिबाच्या मृत्यूचेवेळी दत्तक पुत्रास मडके धरण्यास नातेवाईकांनी मनाई केली,म्हणून स्वतः सावित्रीमाईने ते मडके धरले.आणि पतीचा वारसा पत्नी होऊ शकते,हे दाखवून दिले.
16.जोतिबांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व ,ज्योतिबानंतर स्वतः केले.चळवळ बंद पडू दिली नाही.
17.सदोदित पतीसोबत राहून ,त्यांचे सोबत कार्य करून स्त्रीपुरूष समानता सिद्ध केली.
18.ज्योतिबा सावित्री ची ” जोडी ” जगप्रसिद्ध झाली आणि आदर्श ठरली.
19.पुण्यात प्लेग ची साथ सुरू झाली,हजारो लोक मरू लागली,सावित्रीमाई मुलांना उचलून दवाखान्यात आणू लागल्या.तो साथीचा म्हणजे संसर्गजन्य महामारीचा रोग होता,तरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा करत होत्या,त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
20.सेवाभावी वृत्तीच्या ,सेवेचे वृत्त घेतलेल्या सावित्रीमाईचा देहांत सेवेतच झाला.
याकरिता त्या ” माता ” या पदाच्या मानकरी झाल्या.माता म्हणजे माया ममता प्रेम काळजी सेवा त्याग.अशा या शिक्षणाची देवता,आपल्या सर्वांची सावित्रीमाता यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन आणि त्यांचे चरणी नतमस्तक.
टीप : सावित्रीमातेसंबंधी अजून काही टिप्स असतील तर यातील अनुक्रमास जोडून सर्वांस पाठवावे आणि सावित्री मातेस हे लेखांकन अर्पण करावे ही विनंती.




