भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दि 26 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत चातगाव कार्यालयात पेसा दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच गोपाल उईके हे अध्यक्षस्थानी होते.सभेला सुरुवात होण्यापूर्वी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच या सभेत पेसा मोबिलायझर सौ.आरती कोडप यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चे नामांतर होऊन विकसित भारत जी राम जी योजना’ (Viksit Bharat Gram Rozgar Yojana – VB-GRAM) हे नवीन विधेयक (Bill) आहे, जे ग्रामीण रोजगार आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करते या बाबतीत तहसील कार्यालयातील श्रीमती गज्जलवर मॅडम सहायक ऐ पि ओ यांनी ग्रामसभेत सविस्तर मुद्द्यासह समजावून सांगितले. या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य, गावातील बरेचसे ग्रामसभासद ,कर्मचारी उपस्थित होते.
सभेतील विषय संपल्यावर रणजीत राठोड, ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



