Home उपक्रम चातगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तर्फे रक्त दान शिबीर व...

चातगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तर्फे रक्त दान शिबीर व गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

दि 15 डिसेंबर 2025 रोज सोमवारला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत चातगाव येथे वानखडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि योग्य मार्गदर्शनाखाली व रामटेके मॅडम विस्तार अधिकारी यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

         या शिबिरात एकूण 24 रक्तदान करणाऱ्या दात्यांनी मोठया उस्फुरतेने सहभाग घेतला. रक्त दात्यांमध्ये मा सोनटक्के वनपरिक्षेत्र अधिकारी चातगाव , शेडमाके तलाठी यांनी रक्तदान केले.

           या सर्व दात्यांना ग्रामपंचायत चातगाव कडून अल्पोपहार ,फळे आणि ज्युस देण्यात आले.या शिबिरातील रक्त नमुने शासकीय रुग्णालय गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ मुकुंद धबाले ,रक्त पेढी वैज्ञानिक अधिकारी अजय ठाकरे आणि राहूल वाळके , ड्रायव्हर बंडू कुंभारे , सहाय्यक राजकुमार भगत , स्वयंसेवक आशिष ,जितेंद्र आणि रोहित या सर्वांच्या चमूने रक्त नमुने स्वीकारले.

         या शिबिरात वानखडे साहेब ग वि अ, गोपाल उईके सरपंच,काटकर पि एस आय , दामुभाऊ सयाम , रणजीत राठोड ग्रामपंचायत अधिकारी , राहुल बावणे सदस्य , नितीन कोत्तावार गेडाम सिस्टर , इप्पावर आरोग्य सेवक , सर्व आश्या वर्कर , अंगणवाडी सेविका , सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

        मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे पाडण्यासाठी तसेच या अभियानात ग्रामपंचायत चातगाव जिल्ह्यातुन प्रथम क्रमाकांसह गुणांकन मिळविण्यासाठी खूप धडपडीने जोमाला लागली आहे.

          या अभियांनातील सर्व निकष उत्कृष्टपणे पार पाडत आहे ,त्यानुसार दिनांक 13 नोव्हेंबर 25 रोजी वनराई साठवण बंधारा बांधकाम दोन नग , प्रत्येक आठवड्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करणे , दिव्यांग लोकांचे प्रमाणपत्र मिळवून यु डी इ डी कार्ड मिळून देने , डोळे तपासून मोफत चष्म्याचें वाटप करणे इत्यादी कामे केली आहेत.

    तसेच या अभियानाचे प्रमुख ७ घटक…

१.सुशासनयुक्तपंचायत (लोकाभिमुखप्रशासन)- समाविष्ट महत्वाचे घटक…

• नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या५ ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्धर करुन देणे.

• नागरीकांच्याई सर्व तक्रारी निकाली काढणे.

• ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यािवर सर्व माहिती प्रसिध्द् करणे.

• गावात सीसीटीव्हीे बसविणे.

• गावातील पात्र लाभार्थ्यांीना आयुषमान भारत कार्ड उपलब्धर करुन देणे.

• गावातील पात्र दिव्यां्गांना ओळखपत्र मिळवून देणे.

२.सक्षमपंचायत (स्वनिधी, CSR, लोकवर्गणी)- समाविष्ट महत्वाचे घटक…

• ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्यांया पेक्षा जास्तच वसूल करणे.

• हजार लोकसंख्येतमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्याकमधून लोकोपयोगी कामे करणे.

• ग्रामपंचायतीचे स्वयतःचे उत्पीन्नल वाढविण्याकसाठी विविध उपाययोजना हाती घेणे.

३.जलसमृद्ध, स्वच्छवहरितगाव – समाविष्ट महत्वाचे घटक…

• गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुध्द पाणी पुरवठा करणे.

• सौर उर्जेचा वापर करुन वीज देयके शून्या्वर आणणे.

• पाण्या्च्यार स्त्रोतांचे बळकटीकरण करणे.

• अपारंपारीक उर्जेचा वापर वाढविणे.

• वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे.

• गावातील घनकच-याचे व सांडपाण्या चे योग्य व्यवस्थापन करणे.

• बंदी असलेल्या व प्लासस्टिकचा वापर पूर्णतः बंद करणे.

४.मनरेगा व इतरयोजनांचे अभिसरण- समाविष्ट महत्वाचे घटक…

• रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.

• या योजनेतून माती व जलसंधारण, घनकचरा व्यावस्थाापन, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, बायोगॅस, शेळीपालन शेड,कांदाचाळ इ. कामे हाती घेणे.

• घरकुल बांधकामात या योजनेतून रु. २८,०००/- चे योगदान घेणे.

५.गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण – समाविष्ट महत्वाचे घटक…

• ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध् करुन घेणे.

• गावांतील शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे.

• गावांत जास्ती त जास्त सौर उर्जेचा वापर करणे.

• गावातील स्मशानभूमी विकास करणे.

• गावात क्रीडांगण व व्याायामशाळा उपलब्ध. करुन देणे.

६.उपजीविका विकास व सामाजिक न्याय- समाविष्ट महत्वाचे घटक…

• मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करुन घेणे.

• गावातील बचत गटांचा विकासात सक्रीय सहभाग घेणे.

• बचत गटांतील जास्ती त जास्त महिलांना लखपती दिदी करणे.

• गावातील युवकांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वनयंरोजगाराच्या संधी देणे.

• गावात शेती गट स्थापन करुन त्यांिची उत्पादकता वाढविणे.

७.- लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ- समाविष्ट महत्वाचे घटक…

• लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करणे.

• आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे.

• गावातील रस्ते दुरुस्त करुन दळणवळणाला चालना देणे. अश्या प्रकारचे निकष पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ग्रामपंचायत चातगाव आगेकूच करीत आहे.  

         वरील निकष पार पडतांना गावांतील नागरिकांच्या सहकार्याने गावाचा विकास करणे असे ग्रामविकास अधिकारी रणजीत राठोड यांनी सांगितले.