युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील आदर्श गाव ग्रामपंचायत सांगवा बु येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत श्री संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा आयोजित केला असून त्या निमित्ताने विशेष जनजागृती कार्यक्रमांमध्ये सत्यपाल महाराजांचे शिष्य पवनपाल वडाळीकर यांचा समाज प्रबोधनचा कार्यक्रम 27 डिसेंबरला शनिवार सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषद शाळेसमोरील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सरपंच राजू पाटील कराळे तसेच उपसरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य सांगवा यांनी प्रसिद्धी पत्रकार केले आहे.



