युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयिनन बॉल बॅडमिंटन पुरुष स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते 24 डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयाने सर्वप्रथम दोन संघावर मात करून उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला त्यानंतर उप उपांत्य फेरीत डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती संघावर एकतर्फी 35-16 व 35-19 अश्या सरळ दोन सेट मध्ये विजयी होऊन उपांत्य फेरीत प्रवेश केला.
त्यानंतर शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती संघावर सुद्धा 35-23, 35-28 अश्या सरळ दोन सेट मध्ये मात करीत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला, अंतिम फेरीमध्ये श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती संघावर 35-29, 35-32 अश्या सरळ दोन सेट मध्ये मात करत सलग आठव्यांदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयिन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
विजयी संघामध्ये सौरभ राखोंडे, स्वराज बरगट, भूषण गायगोले, प्रफुल पचारे, गौरव राजस, ओम पांडे, क्रिश अंभोरे, वेदांत मेमनकर, सुहास मावस्कर व अर्जुन यादव यांचा समावेश होता.
संघातील विजयी खेळाडूंनी आपल्या या दैदिप्यमान यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चूभाऊ कडू, संस्थेचे सचिव भैयासाहेब कडू, कार्यकारी प्राचार्य डॉ. रविंद्र इचे, प्रशिक्षक डॉ. हरीश काळे, अशोक बिजवे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.



