शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने दिनांक २१ ते २७ डिसेंबर दरम्यान,”ग्रामगिता,रामकथा व श्रीमद् भागवतकथा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.
या भागवत सप्ताहा निमित्त कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार किर्तीकुमार भांगडिया व सरपंच गजानन गुळधे यांना उपस्थित राहण्याचा योग लाभला.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व सप्ताहाच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली.
या सप्ताहाप्रसंगी दिनांक २३ डिसेंबरला पळसगाव येथील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच हनुमान मंदिरात विधिवत पूजन करून राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन आमदार किर्तीकुमार भांगडिया व सरपंच गजानन गुळधे यांनी घेतले.
यावेळी ह.भ.प.श्री.शंकर कावळे महाराज यांचे आशीर्वाद आमदार किर्तीकुमार भांगडिया व सरपंच गजानन गुळधे यांना लाभले.आयोजक समितीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या ठिकाणी गेल्या सोळा वर्षांपासून सातत्याने भागवत सप्ताहाचे आयोजन होत असल्याची माहिती देण्यात आली.या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या आयोजक समितीचे आमदार किर्तीकुमार भांगडिया व सरपंच गजानन गुळधे यांनी अभिनंदन केले व मार्गदर्शनाद्वारे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व सदभाविकांना शुभेच्छा दिल्यात.
आमदार किर्तीकुमार भांगडिया,चिमूर तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष गजानन गुळधें,भाजपा कार्यकर्ता दुमदेव बोरकर,मासळ मदनापूर सर्कल प्रमुख प्रविण गणोरकर,गावातील प्रतिष्ठीत नागरिक दशरथ दडमल,भाजपा कार्यकर्ता वर्षा लोनारकर,भाजपा बूथ अध्यक्ष जानिक बन्सोड,माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर वाटगुरे भाजपा कार्यकर्ता राजू आत्राम,यांनी मौजा पळसगाव येथील सप्ताह कार्यक्राला भेट देऊन आयोजकांचे मनोबल वाढवले.



