प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मी भिसी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहे,निवडणुकीत विजयी होण्याचा प्रयत्न करणार आहे.भिसीतील मतदार बंधू भगिनी मला सहकार्य करतील असा आशावाद आहे.मला नगराध्यक्ष म्हणून भिसी येथील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली तर माझे उत्तम कर्तव्य समजेल…
पण हरलोच तर मी कुणालाही दोष देणार नाही आणि कुणाचाही विरोध करणार नाही,निवडणूक जिंकण्यासाठी लढली जाते.पण,हरलोच तर मी माझ्या भिसी नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढलो याचे मला समाधान असेल,”हे शब्द होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे!,”म्हणूनच म्हणतो आकाश पाटील हरुनही जिंकलाय!
एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला आणि स्वतःच्या बलावर यशस्वी वाटचाल करणारा,”आकाश पाटील,हा आकाश भरारी घेतोय आणि आयुष्यात समजदारीने वाटचाल करतोय हेच त्याच्या आयुष्याचे खरे गमक आहे.
यशस्वी जिवनाची ओढ सर्वांना असतय.हा संदर्भ लक्षात घेतला तर,”आकाश पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न आत्मविश्वासाचे आणि दृढ सदिच्छांचे होते हे विसरून चालणार नाही.
पण,नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आकाशचा झालेला पराभव,”त्याला खूप मोठा राजकीय व सामाजिक व्यवस्थेचा अनुभव देऊन गेलाय आणि आकाश पाटील परत मजबूत झालाय…
आकाश हा,”आकाश झेप घेणार,आणि त्याचे बल त्याला येणाऱ्या काळात आवश्यक उंची गाठण्यास सहकार्य करणार येवढे पक्के!
आकाश कठीण परिस्थितीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतो आणि स्वतःला धैर्याने सावरतोय,”म्हणूनच तो नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हरुनही जिंकलाय!…



