दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. भाजपचे उमेदवार सचिन गिलबिले यांनी तब्बल ९६४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला. तर भाजपच्या सुजाता तापकीर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
या निवडणुकीत भाजपचे सचिन गिलबिले यांना १,२५८ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामप्रसाद कवडे यांना २९४ मते, तर भाजपचे बंडखोर उमेदवार भागवत आवटे यांना केवळ ९२ मते मिळाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत गिलबिले यांनी आघाडी कायम ठेवत सहज विजय मिळविला.
दरम्यान, याच प्रभागात भाजपच्या सुजाता कालिदास तापकीर या बिनविरोध निवडून आल्याने भाजपसाठी हा प्रभाग पूर्णतः सुरक्षित ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बंडखोर उमेदवारांचा झालेला दारुण पराभव लक्षवेधी ठरला.
संघटित प्रचार, स्थानिक कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांनी भाजपवर दाखविलेला विश्वास या विजयामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.



