Home Maharashtra 1 जानेवारीला,”चिमुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन…

1 जानेवारीला,”चिमुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

    चिमुर येथील बौद्ध धम्म उपासक संघ व अ.भा.बौद्ध महासभा चिमुरच्या वतीने दिनांक 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मेन रोड इंदिरा नगर चिमूरचे मैदानावर आयोजित भिमा कोरगाव शौर्य दिन कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता समता सैनिक दलाच्या मानवंदनेने प्रारंभ होणार आहे.

        सकाळी 11 वाजता बौद्ध धम्म उपासक संघाचे अध्यक्ष निलकंठ शेंडे यांचे अध्यक्षतेखाली मुख्य मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

         यावेळी विशेष अतिथी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते संजय बोधे,सुरेश डांगे,विरेंद्र बन्सोड,डॉ.आशिष पाटील यांना निमंत्रीत केले आहे. 

         या कार्यक्रमाचे संचालन बौद्ध धम्म उपासक संघाचे सचिव दिगांबर बोरकर व प्रास्ताविक भागवत बोरकर हे करतील.

      दुपारी 12 वाजता बुद्ध भिम गीताचे आयोजन केले असुन आयोजक संगीत वाद्य उपलब्ध करून देणार आहेत.गीत गायन सर्वांना खुले असले तरी नियोजन करण्यासाठी गीत गायन करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी 9421928709, 9767085227 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून करावी.

                सायंकाळी 4 वाजता दिगांबर बोरकर यांचे अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन ब्रम्हपुरीचे माजी नगर सेवक अशोक रामटेके, अॅड. नितीन पाटील, सुरेश डांगे, अखिल भारतीय बौद्ध महासभा चिमुरचे अध्यक्ष वतन सहारे,बौद्ध धम्म उपासक संघाचे सक्रीय सदस्य जगदीश पडोळे,धम्मांजली महिला मंडळाच्या प्रतिक्षा सोरदे,समता सैनिक दलाचे चिमुर तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील,संबोधी बुद्ध विहाराचे अध्यक्ष किशोर जांभुळकर, नंदन लोखंडे,चंद्रकला गायकवाड,वासुदेव गायकवाड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

        या कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन बौद्ध धम्म उपासक संघ व अखिल भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने करण्यात येत आहे.