Home Political ब्रम्हपुरी नगरपरिषद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे… — माजीमंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार...

ब्रम्हपुरी नगरपरिषद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे… — माजीमंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची लोकप्रियता कमालीची…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

            ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला असून २३ पैकी नगराध्यक्षा सह तब्बल २१ नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडून आले.ब्रम्हपुरीच्या मतदारांनी नगराध्यक्ष पदाची धुरा योगेश मिसार यांच्यावर टाकली आहे.

         माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणजे लोकप्रिय व्यक्तीमत्व.ते ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे जननायक म्हणून ओळखले जातात.

          याचबरोबर ते महाराष्ट्र राज्यातील कणखर राजकीय नेतृत्व आहेत.त्यांच्या कार्यात व कर्तव्यात भेदभाव नावाची विकृती व कृती सध्यास्थितीत दिसत नाही.

           त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरी नगरपरिषदेची निवडणूक पार पडली होती.ब्रम्हपुरीच्या मतदारांनी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर कमालीचा विश्वास दाखवला व नगराध्यक्षासह २१ नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडून दिले.