उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्यातील १४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतीच्या निवडणूका २ डिसेंबरला झालेल्या आहेत.परत २० डिसेंबरला काही नगरपरिषदेच्या व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
यानंतर २१ डिसेंबरला सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे लक्ष २१ डिसेंबरकडे लागले आहे..
२ डिसेंबरला झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीचा निवडणूक निकाल हा लांबणीवर ढकलण्याचे काम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांनी केले.मतमोजणी लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांचा प्रकार बेकायदेशीर असल्याचे वंचितचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुध्दा महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांच्या निर्णयावर तिव्र संताप व्यक्त करीत चांगलेच झापले होते.
आता परत राजकीय चित्र तापू लागले आहेत.जसेजसे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मतमोजणीचे दिवस जवळ येवू लागले आहेत,तसाच विजय-पराजयाच्या चर्चांना जागोजागी वेग आला आहे.
राष्ट्रीय पक्षांचे तथा प्रादेशिक पक्षांचे उमेदवार म्हणतात आम्ही निवडून येणार तर अपक्ष उमेदवार म्हणतात आम्ही मतदार भरोसे!
कोण निवडून येणार हे नक्की २१ डिसेंबरला कळणार!पण,काही उमेदवारांना निवडणूकीचा कल मात्र कळलेला असेल.परंतु यावेळी मतदारांची काय परिस्थिती आहे,आणि त्यांनी कुणाच्या बाजूने कल दिला आहे २१ डिसेंबरला स्पष्ट होणारच!
तद्वतच नगरपरिषद व नगरपंचायतीचा लांबणीवर पडलेला निकाल हा कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाच्या बाजूने कौल देणार हे २१ डिसेंबर २०२५,रोज रविवारला कळणारच!



