जगात 70 टक्के लोक अस्तित आहेत आणि 30 टक्के लोक नास्तिक आहेत, अस्तिक लोक दैव पुनर्जन्म मोक्ष या संकल्पनांना मान्यता देतात तर नास्तिक लोक या संकल्पना म्हणजे अज्ञान आहे अस सत्य आहे असे म्हणतात.
१. देव — म्हणजे ईश्वर भगवान अल्ला गॉड. माणसाला ही संकल्पना का सुचली असावी ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे महत्त्वाचे आहे.
देवाने माणसाला निर्माण केले की माणसानेच देवाला निर्माण केले हा एक वादाचा किंवा चिंतनाचा विषय आहे किंवा संशोधनाचा विषय आहे, इथे यावर आपल्याला चर्चा करायची नाही. इथे फक्त देव दैव पुनर्जन्म आणि मोक्ष यावरच या लेखात चर्चा करायचे आहे किंवा चिंतन करायचे आहे.
आस्तिक लोक असे मानतात की, देवानेच हे ब्रम्हांड निर्माण केले, त्यात पृथ्वी हा एक ग्रह त्यानेच निर्माण केला, आणि ह्या ग्रहावरील निसर्ग म्हणजे पाणी हवा अग्नी माती वृक्ष माणूस प्राणी पक्षी जीवजंतू थोडक्यात जड सृष्टी आणि जीवसृष्टी या पृथ्वीतलावर देवानेच निर्माण केली, सृष्टीचा निर्माता तोच आहे, उत्पत्ती वृद्धी लय म्हणजे निर्माण करणे ते वाढविणे म्हणजे त्यात प्रगती करणे आणि ते नष्ट करणे या तिन्ही गोष्टी तोच करीत असतो म्हणजे देवाचेच हे कार्य आहे, म्हणून त्यास या सृष्टीचा निर्माता शिल्पकार कुंभार म्हटले आहे. कुंभार हा मडके घडवितो निर्माण करतो तसा हा या पृथ्वीतलावरील सर्व जीव आणि वस्तू तोच निर्माण करतो आणि त्याच्या मनात आले तर तोच नष्टही करतो, याचा अर्थ जन्म आणि मृत्यू हे त्याच्याच हातात आहे, हे सिद्ध करण्यासाठी किंवा या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसण्यासाठी प्रचाराचा एक भाग म्हणून काही अभंग तयार करण्यात आलेले आहेत त्यातील एक अभंग म्हणजे “विठ्ठला तू गोरा कुंभार, तूच घडविशी तूच मोडिशी”.
देवा बद्दलचे एकीकडे हे शिक्षण देण्यात येते, तर याच वेळेस दुसरीकडे ‘ दैव ‘ या संकल्पनेचे पण शिक्षण देण्यात येते, ते म्हणजे असे की, माणसाची निर्मिती देव करतो, परंतु त्याचे दैव मात्र ‘ सटवी ‘ लिहीत असते. हे दैवत त्याच्या म्हणजे माणसाच्या कपाळावर जन्मताच किंवा माणूस जन्माला येण्याच्या आधीच सटवी लिहून ठेवते, आणि ती जे लिहून ठेवते ते म्हणजे दैवत आणि ते जसे लिहिलेला आहे तसे त्याच्या जीवनात घडत असते, जसे की, माणूस कोणत्या जातीत जन्माला यावा किंवा कोण्या धर्मात जन्माला घालावे आणि त्याला गरिबीत टाकावे की मध्यम वर्गात टाकावे की श्रीमंत वर्गात टाकावे हे सटवी लिहून ठेवते त्यानुसार त्याचा त्या धर्मात जातील किंवा वर्गात जन्म होत असतो आणि त्यानुसार म्हणजे त्या जातीला धर्माला आणि वर्गाला समाजात जी वागणूक मिळते ती त्याला भोगणे प्राप्त होते.
वरील विश्लेषणावरणाशी दिसते की, या पृथ्वीतलावरील माणसाचे काय करायचे ? ते ईश्वर आणि सटवी या दोघांनी वाटून घेतलेले आहे, या दोघांचे ठराविक कार्य आहे. माणसाला जन्मास घालावे त्यास वाढवावे आणि त्यास मारावे हे तीन काम देवाची आहे किंवा देवाने आपल्या स्वतःकडे घेतले आहे, म्हणजेच या तीन गोष्टीची जबाबदारी देवाने घेतलेले आहे. आणि सटविणे या माणसाला किंवा या माणसाने कुण्या वातावरणात कुण्या परिस्थितीत जगावे हे ठरविण्याचे काम स्वतःकडे घेतलेले आहे, देव माणसाला जन्मास घालतो परंतु त्यास गरीब ठेवावे की श्रीमंत ठेवावे हे मात्र सटवी ठरवीत असते, तसेच तो स्पर्श असावा की अस्पृश्य, तो सवर्ण असावा की दलित, तो हिंदू असावा की मुस्लिम असावा की ख्रिश्चन असावा ? हे ठरविण्याचा अधिकार सटवीकडे आहे, म्हणजे दैव नावचे डिपार्टमेंट किंवा मंत्रालय हे सटवीकडे दिसते.
३. पुनर्जन्म — देव , दैव, याबरोबरच पुनर्जन्म ही एक संकल्पना धार्मिक तत्त्वज्ञानात किंवा धार्मिक विषयांमध्ये विशद केलेली आहे.
” पुनर्जन्म ” या संकल्पनेत असे सांगितलेले आहे की, लक्ष 84 योनी फिरल्यानंतर माणसाला मनुष्याचा जन्म मिळत असतो. याचा अर्थ जीवजंतू, वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्यात जोड्या जाती असतील किंवा जेवढे प्रकार असतील त्या सगळ्या प्रकारातून माणूस बाहेर पडत असतो याचा अर्थ या जीवसृष्टीचा शेवटचा टप्पा म्हणजे माणूस.
अर्थात माणूस हा माणसाच्या जन्माला आल्यानंतर या जन्मात तो किती पाप कर्म करतो आणि किती पुण्य कर्म करतो याची नोंद हा चित्रगुप्त हा एक व्यक्ती करीत असतो, चित्रगुप्त हा व्यक्ती जसा देव सटवी स्वर्गात राहत तो तसाच हा सुद्धा स्वर्गातच असतो, आणि तेथून तो प्रत्येक माणसाच्या पापकर्माची आणि पुण्यकर्माची नोंद करीत असतो, अर्थात माणसाचा जीव घेण्याचे काम देवाचे आहे तेव्हा देवाने माणसाचा म्हणजे देवाने माणसातील जीव काढून घेतल्यानंतर त्या ठिकाणी देव यमाला पृथ्वीतलावर त्याच्याकडे पाठवतो आणि त्याचा आत्मा घेऊन तो ये चित्रगुप्ताकडे येतो, आणि त्यास चित्रगुप्ताच्या समोर हजर करतो, चित्रगुप्त त्या आत्म्याला किंवा आत्म्यापुढे त्याने मनुष्य जन्मात केलेल्या सर्व पापाचे आणि पुण्याचे वाचन करून दाखवतो, आणि त्यानुसार त्याला रिझल्ट देतो की, आता या आत्म्याला जीव जंतू मध्ये पाठवायचे की वनस्पतीचा जन्म द्यायचा की पक्षाचा जन्म द्यायचा की प्राण्याचा जन्म द्यायचा की माणसाचा जन्म द्यायचा ? आणि वनस्पती पक्ष पशु आणि मानव यातील म्हणजे यांच्यातील कोण्या जातीत जन्माला घालायचे, हे काम तरगुप्ताचे असते, याचा अर्थ पुनर्जन्माचे मंत्रालय किंवा डिपार्टमेंट हे चित्रगुप्ताकडे आहे, आणि पोलीस डिपार्टमेंट हे येमा कडे दिसते.
अर्थात अति पुण्य कर्म करणारा आत्मा मनुष्य देह धारण करतो, आणि ज्याचे पुण्य आणि पाप समप्रमाणात घडलेल्या असते त्याला प्राणी योनीमध्ये जन्म दिला जातो, आणि पुण्यापेक्षा ज्याने जास्त केलेले असते त्यास सरपटणाऱ्या किंवा वळवळणाऱ्या जीवजंतूचा जन्म दिला जातो, आणि जो बापाची कळस गाठतो त्याला वनस्पतीचा जन्म दिला जातो. अशाप्रकारे वनस्पती जीव जंतू पशु पक्षी अशा ह्या जीवसृष्टीतील चार प्रकारांमध्ये माणसा चा आत्मा प्रविष्ट होतो, आणि आश्चर्याची आणि विशेष गोष्ट अशी की, माणसाने आपल्या अख्या आयुष्यात जर पापही केले नाही आणि पुन्हा ही केले नाही म्हणजेच पाप आणि पुण्यरहीत जीवन जो जगला याचा अर्थ पुनर्जन्माच्या कक्षेच्या तो बाहेर पडला, पुनर्जन्माच्या प्रक्रियेच्या बाहेर पडणे म्हणजेच मोक्ष होय, ज्याने आपल्या अख्ख्या आयुष्यात पापही केले नाही आणि पुण्य कर्मही केले नाही असा माणूस मोक्षप्राप्तीस सिद्ध होतो, म्हणजेच त्यास मोक्ष मिळते, मोक्ष याचा अर्थ पुनर्जन्माच्या प्रक्रियेत किंवा पाप पुण्याच्या भानगडीत न पडणे. मोक्ष मिळवायचा असल्यास लक्ष 84 योनी चुकवायची असल्यास पाप करता येणार नाही त्याचबरोबर पुणे ही करता येणार नाही, पुण्य का करू नये ? याचे कारण असे सांगितले आहे की, पुण्य कर्म सुद्धा हे माणसाच्या अहंकारापोटीच होत असते, म्हणून माणूस दान देत असताना कुठेही आपले नाव नोंदवीत असतो, आणि अहंकारापोटी केलेले कर्म मग ते पाप असो की पुण्य असो, मोक्षाच्या कसोटीत बसत नाही, थोडक्यात सांगायचे तर, अहंकार हा माणसाला पुनर्जन्माच्या वर्तुळात किंवा चक्रात अडकवीत असतो, अहंकारामुळेच पाप कर्म किंवा पुण्य कर्म घडत असतात, म्हणून अहंकारातून केलेले पुण्य कर्म हे पण चुकीचे असते, कारण त्याने ते स्वतःसाठी केलेले असते, त्यात स्वार्थ असतो, अहंकार हा माणसाच्या स्वार्थाला बढावा देत असतो, अंकारामुळेच माणूस चांगले मार्गाने किंवा वाईट मार्गाने स्वतःची प्रतिष्ठा सत्ता संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो जे चुकीचे आहे. पुनर्जन्माचा हा सिद्धांत हेच सांगतो की, लक्ष 84 योनी फिरवून आल्यानंतर मिळालेला हा पुनर्जन्म म्हणजे माणूस, या जन्मात जर अहंकाराने वागलो तर एकतर पाप कर्म आपल्या हातून घडतील त्याचा परिणाम म्हणून परत लक्ष 84 योनीच्या ह्या चक्रात पडावे लागेल, आणि अहंकारापोटी अति पुण्य कर्म जर झाले तर, परत मनुष्यजन्मच मिळेल, परंतु हा मनुष्य जन्म कोणत्या जातीत धर्मात आणि वर्गात मिळतो त्यानुसार जीवन जगणे प्राप्त होते, या सर्व झंजेटीतून सुटायचे असेल तर, पाप कर्म ही नको आणि पुण्य कर्म ही नको, आणि मनुष्य जन्म पण नको, म्हणजेच मोक्ष हवा. अर्थात हा मोक्ष कशासाठी हवा ? माणूस मोक्ष प्राप्ती मिळवून काय करणार आहे? मोक्षाचा शेवटी अर्थ काय किंवा हेतू काय ? प्रयोजन काय ? याचे उत्तर मात्र या मोक्ष प्राप्तीच्या संकल्पनेत सापडत नाही. म्हणून मोक्ष प्राप्तीच्या ह्या झंजेटीत तरी का पडायचे ? असा सुज्ञ माणसास प्रश्न पडतो.
देव दैव पुनर्जन्म मोक्ष या संकल्पना माणसानेच निर्माण केल्या आणि त्या विकसित केल्या त्या राबविल्या यासाठी ” धर्म “या संकल्पनेचा शोध माणसाने लावला. देव दैव पुनर्जन्म मोक्ष पाप पुण्य आत्मा परमात्मा देवाची आराधना प्रार्थना श्रद्धा आस्था पूजा कर्मकांड पोथी पुराण धर्मग्रंथ तीर्थाटन या सर्व गोष्टी धर्म या नावाने प्रचलित झाल्या. खरे तर धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे मान्यता. परंतु माणसाने माणसाकडे स्वतःची बुद्धी आणि शक्ती आणि प्रेरणा या निसर्गनिर्मित गोष्टी असताना माणसाने विचार न करता विवेकाचा वापर न करता या सर्व धार्मिक कल्पना देवाशी जोडल्या त्यामुळे या सर्व धार्मिक विधी अंधश्रद्धा बनल्या. जिथे विचार बुद्धी विवेक नसतो तिथे सज्ञान नसते, ज्ञान नसते, तरा ज्ञान असते, तिथे सत्य नसते तर केवळ असत्यच असते, जिथे अंधश्रद्धा असतात तिथे विज्ञान संशोधन तर्क अनुभव यास थारा नसतो, म्हणूनच माणसांचे नुकसान हे निश्चित असते. अर्थात आर्थिक नुकसान आणि सामाजिक नुकसान.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक 18 डिसेंबर 2025, फोन: 9420912209.



