प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बार्टी आणि सार्थी च्या माध्यमातून पिएचडी करायला मिळणारे आर्थिक सहकार्य फार अल्प प्रमाणात आहे.तद्वतच या देशातील तथा महाराष्ट्र राज्यातील होतकरू विद्यार्थी,युवक-युवती,पुरुष व महिला पिएचडी करायला तयार असतील तर महाराष्ट्र सरकारने विनाअट त्यांना अपेक्षित आर्थिक सहकार्य केले पाहिजे.
पिएचडी करणारे व पिएचडी करु इच्छिणारे या देशातील नागरिक आहेत आणि मतदार सुध्दा आहेत.या देशातील जडणघडणीत त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा मोलाचा वाटा असतो याचे विस्मरण सत्ताधाऱ्यांना होता कामा नये.
एका घरात शंभर मतदार असले तर त्या घरातील सर्व मतदारांनी आम्हाला मतदान करावे ही अपेक्षा सर्व पक्षांची असते.या अपेक्षेला सर्वच राजकीय पक्ष नाकारु शकत नाही.
याचप्रमाणे एका घरातील पाच व्यक्ती क्वचित पिएचडी करणारे असतील.मात्र,पिएचडी करणारे क्वचित असतात हे सत्य सुध्दा आहे.
राजकारणी बनने कठीण काम असेल तर पिएचडी करणे त्याहून कठीण काम आहे.राजकारणी बनण्याची इच्छा प्रत्येक व्यक्ती व्यक्त करेल,परंतु पिएचडी करण्याची इच्छा प्रत्येक व्यक्ती व्यक्त करु शकत नाही.
हि बाब लक्षात घेतली तर सर्वसाधारण गोरगरिबांच्या मुलांना पिएचडीच्या माध्यमातून ज्ञानी,तत्वेता,संशोधक,समाजसुधारक,प्रशासकीय व शासकीय यंत्रणेचा घटक होत असेल तर महाराष्ट्र सरकारने बार्टी व सार्थी च्या माध्यमातून त्यांना आवश्यक आर्थिक मदत बिनधास्त केली पाहिजे.
महाराष्ट्र राज्यातील होतकरू विद्यार्थी,युवक-युवती,पुरुष-महिला पिएचडी करायला भरभरून प्रोत्साहन महाराष्ट्र सरकारने दिले पाहिजे.महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक दर्जा हा उत्तम ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार सदैव तत्पर राहिले पाहिजे.
तद्वतच फक्त एका कुंभ मेळ्याला १४ हजार कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र सरकार करीत असेल तर पिएचडी करु इच्छिणाऱ्यांना देण्यात येत असलेली आर्थिक मदत फारच तोकडी आहे.
पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) म्हणजे तुमच्या निवडलेल्या विषयात सखोल आणि मूळ संशोधन करून मिळणारी सर्वोच्च शैक्षणिक पदवी आहे,ज्यासाठी पदव्युत्तर पदवी (किमान ५५% गुण) आवश्यक असते आणि विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसोबत (PET/NET/SET) मुलाखत द्यावी लागते.
यानंतर ३-५ वर्षांच्या संशोधनानंतर प्रबंध सादर करावा लागतो,ज्यामुळे प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून करिअर करता येते.
पीएचडी म्हणजे काय?
डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Doctor of Philosophy), ही डॉक्टरेट स्तरावरील पदवी असून,यामध्ये ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे महत्त्वपूर्ण आणि मौलिक संशोधन अपेक्षित असते.
संशोधन उमेदवाराला स्वतःचे मूळ संशोधन करून प्रबंध (Thesis) सादर करावा लागतो आणि त्याचे तोंडी परीक्षेत (Viva-Voce) सादरीकरण करावे लागते.
प्रवेश परीक्षा…
विद्यापीठाची स्वतःची प्रवेश परीक्षा (PET) किंवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा जसे की UGC-NET, CSIR-NET, GATE, SET उत्तीर्ण असणे आवश्यक असू शकते.प्रवेश प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,जिथे संशोधनाच्या विषयावर चर्चा होते.
पीएचडीसाठी पात्र होण्यासाठी,उमेदवारांकडे किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा किमान ७.५ CGPA (UGC नुसार) असलेली चार वर्षांची बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना UGC NET किंवा GATE सारख्या प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्यांना मुलाखत उत्तीर्ण होणे आवश्यक असू शकते.
पीएचडी (PhD) म्हणजे ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (Doctor of Philosophy) या पदवीचे संक्षिप्त रूप असून,ही एखाद्या विशिष्ट विषयात केलेले सखोल,मूळ संशोधन आणि त्यातून ज्ञानवृद्धी करणाऱ्या व्यक्तीला मिळणारी सर्वोच्च शैक्षणिक पदवी आहे.
यात विद्यार्थ्याला स्वतःच्या निवडलेल्या क्षेत्रात (उदा. विज्ञान,साहित्य,कायदा, इ.) स्वतंत्रपणे संशोधन करून,त्याचे निष्कर्ष एका प्रबंधाच्या (Thesis) स्वरूपात सादर करावे लागतात,जेणेकरून त्या विषयाच्या ज्ञानात भर पडेल.
‘फिलॉसॉफी’ या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानाचे प्रेम’ (Love of Wisdom) असा आहे,आणि पीएचडी या पदवीमध्ये त्याचा संदर्भ व्यापक ज्ञानाच्या शोधाशी जोडलेला आहे.
नवीन ज्ञान निर्माण करणे,सिद्धांतांचे विश्लेषण करणे,आणि आपल्या क्षेत्रातील ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे हा पीएचडीचा मुख्य उद्देश असतो.
पीएचडी पूर्ण होण्यासाठी ३ ते ६ वर्षे लागू शकतात,पण ते अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या गतीवर अवलंबून असते.
पीएचडी धारक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक,संशोधक,तज्ञ किंवा उच्च पदांवर काम करू शकतात.
यात प्रामुख्याने मूळ संशोधन,डेटा विश्लेषण आणि प्रबंध लेखन यांचा समावेश असतो.पीएचडी म्हणजे कोणत्याही विषयात डॉक्टरेट मिळवण्यासाठी केलेला एक उच्च दर्जाचा,संशोधन-आधारित अभ्यासक्रम आहे.
पीएचडीचा कालावधी पूर्णवेळ असल्यास साधारणपणे ३ ते ५ वर्षे आणि अर्धवेळ केल्यास ५ ते ७ वर्षांपर्यंत असू शकतो,जो विद्यापीठ,देश आणि संशोधनाच्या विषयावर अवलंबून असतो.
काही प्रवेगित (accelerated) किंवा ऑनलाइन कार्यक्रम २-३ वर्षांतही पूर्ण होऊ शकतात,तर भारतातही हे ३ ते ५ वर्षांपर्यंत असू शकते.
प्रत्येक देशाच्या आणि विद्यापीठाच्या नियमांनुसार पिएचडीचा कालावधी बदलतो.पीएचडीचा कालावधी निश्चित नसून तो तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर आणि संशोधनाच्या प्रगतीवर अवलंबून असतो.
पिएचडी करणे म्हणजे बनवाबनवी करणे व उलटसुलट बोलणे नव्हे.याचबरोबर रुपयांची उध्दळपटी करणे नव्हे तर महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक सहयोगातून स्वतः स्वतःच्या शिध्दांतात स्वयंसिद्ध होणे होय.
यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो होतकरूंना आर्थिक सहकार्य करुन संशोधक बनविले पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचे नाव तत्ववेत्ता,संशोधक,ज्ञानी म्हणून देशपातळीवर आणि विदेशात कोरले पाहिजे.



