Home Political शिवसेना उबाठाच्या शहराध्यक्षा रुपाली आल्हाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये...

शिवसेना उबाठाच्या शहराध्यक्षा रुपाली आल्हाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा रुपाली परशुराम आल्हाट यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात अधिकृत प्रवेश केला आहे.

        हा प्रवेश सोहळा पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना रुपाली आल्हाट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

        यावेळी बोलताना रुपाली आल्हाट म्हणाल्या की, “शहराच्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा योग्य मंच आहे. पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला आहे.”

        दरम्यान, त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना उबाठा गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.