Home Political भाजपच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश…

भाजपच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

       उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक वसंत बोराटे व स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

       नगरसेविका अश्विनी जाधव या महापालिकेत कार्यतत्पर प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. प्रभागातील नागरी समस्या, विकासकामे तसेच सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची शहरातील ताकद वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाधव यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहराच्या विकासासाठी केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तर जनतेच्या प्रश्नांना न्याय देता यावा आणि विकासाला गती मिळावी, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचे अश्विनी जाधव यांनी सांगितले.