उपक्षम रामटेके/शुभम गजभिये
आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी भिख्यूसंघ संस्था मालेवाडा,बौध्द पंच कमेटी तथा भिमज्योती महिला मंडळ मालेवाडा यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील,”आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी येथे भव्य धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.याचबरोबर भिख्यूंच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा दोन दिवसीय असून १६ व १७ डिसेंबरला धम्मदेशनेचा कार्यक्रम पार पडणार आहे.तद्ववच १७ डिसेंबरला मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
“किच्छो मनुरस पटिलाभो किच्छं मच्चानं जीवितं किच्छं सध्दम्म सवणं किच्छो बुद्धानं उप्पादो॥
सुधारित माणसाचा जन्म प्राप्त होणे दुर्मिळ आहे.दुर्मिळ आहे माणसाचे दिर्घकाळ जिवीत रहाणे,त्याही पेक्षा दुर्मिळ आहे सद्धम्म मिळणे,त्याही पेक्षा दुर्मिळ आहे बुद्धाचा जन्म होणे.
दान देणे पुण्याकारक आहे.धम्मदाणाची तुलना कोणत्याही अन्य दानात केल्या जात नाही.(नववा शिलालेख अशोक सम्राट)…
अडीच हजार वर्षे झाली,प्रथम बुध्द शासन संघले आणि व्दितीय बुध्द शासनाची पहाट झाली.या धम्ममय पहाटेला डॉ.बाबासाहेबांनी भारतात निर्माण होऊन नष्ट पावलेल्या धम्माचे १४ ऑक्टोंबर १९५६ ला धम्मदिक्षा घेऊन पुर्नज्जीवन केले व या व्दितीय बुध्द शासनाचे आनंदाचे स्वागत केले.
तेव्हापासुन हजारों वर्षे निपरिचीत पडुन राहीलेला हा धम्मध्वज पुन्हा फडकला आणि हजार वर्षानंतर पुन्हा या वायु मंडळात धम्मतरंग प्रस्थापित झाले.
भिक्षु मोठे झाले,धम्माचाप्रचार करु लागेल.आज ६८ वर्षे होऊन गेली,आपण हा धम्म जगत आहोत.
बाबासाहेबांना अपेक्षित नसलेल्या इतर महायान बौध्द राष्ट्रातील परंपरांचा महाराष्ट्रत झालेला शिरकाव व महाराष्ट्रात धम्माविषयी आसणाऱ्या वेगवेगळ्या विचारधारा यामुळे बौध्द जनतेत धम्मविषयी एक वैचारिक वादळ निर्माण झाले आहे.
तेव्हा पुन्हा एकदा भिक्खुसंघाने समरत जनतेला आवाज दिला आहे.चला! एकत्र या,धम्म श्रवणासाठी हिच सुयोग्य वेळ आहे.
या करीता आम्रवन दिक्षाभुमी सुगतकुटी मालेवाडा,ता.चिमूर,जि.चंद्रपुर येथे दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२५ ला खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत.या करीता आपण सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वतोपरी सहकार्य करावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा…
मंगळवार,दि. १६/१२/२०२५ ला सकाळी ९.०० वा.पंचशिल ध्वजारोहण,बुध्दवंदना,समता सैनिक दल शाखा पथ संघाची मान वंदना..
सकाळी १०.०० वा.भिक्खुसंघाची धम्म देसना होणार आहे तर,सकाळी ११.०० वा.भिक्खुसंघाला भोजन दान देण्यात येणार आहे.
दुपारी पारी १.०० वा. बुध्द आणि धम्माचे भवितव्य या विषयावर धम्मदेशना होणार आहे.
तर सायं. ७ ते ११ वा.”मी रमाई व सावित्री बोलतेय एकपात्री प्रयोग सादर करण्यात येणार आहे.सादरकर्त्या प्रा.सौ.मनीषा भास्कर लेनगुरे ने.हि.महाविद्यालय ब्रम्हपुरी या आहेत..
यानंतर रात्री १२ ते ५ वाजता पर्यंत भिख्यू संघाद्वारे महापरित्राण पाठ होणार आहे.
नागदिप भन्तेजी महाथेरो,भिलाई छ.ग.,सुगतानंद भन्तेजी महाथेरो मालेवाडा,नागसेन भन्तेजी थेरो आलेबेदर,आनंद भन्तेजी थेरो आलेबेदर,विपस्सी भन्तेजी थेरो नागपुर,रेवत भन्तेजी जालना,सत्यबोधी भन्तेजी जालना,आर्या उप्पलवण्णा (वर्धा),आर्या विशाखा (नागपुर),करुणाशीला (नागपुर) हे महापरित्राणपाठ करणार आहेत.
बुधवार, दि.१७/१२/२०२५ ला सकाळी ९ ते ११ वाजता दरम्यान भिक्खुसंघाची धम्म देसना होईल व सकाळी ११ वाजता भिक्खुसंघाला भोजन दान देण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.डाॅ.आशिष पाटील चिमूर,डॉ.संजय पाटील जांभुळघाट हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
दुपारी १.३० वाजता मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या मार्गदर्शन कार्यक्रमाला गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान,श्री.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.श्री.राजेश कांबळे ग्रामविकास अधिकारी मालेवाडा,श्री.कालीदास भोयर सरपंच, ग्रा.पं.मालेवाडा,श्री.शंकर दडमल उपसरपंच,ग्रा.पं. मालेवाडा,श्री.हेमंतकुमार गजभिये पोलिस पाटील,श्री.प्रविण जिवतोडे तमुसे अध्यक्ष मालेवाडा,श्री.सिध्दार्थ नगराळे सामाजिक कार्यकर्ता, नांद (नागपूर) हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर लगेच भिक्षुची धम्मदेशना दु. ३.०० ते ५.०० पर्यंत होणार आहे.
नागदिप भन्तेजी महाथेरो, भिलाई छ.ग.,सुगतानंद भन्तेजी महाथेरो मालेवाडा,नागसेन भन्तेजी थेरोआलेबेदर,आनंद भन्तेजी थेरो,आलेबेदर,विपस्सी भन्तेजी थेरो नागपुर,रेवत भन्तेजी जालना,सत्यबोधी भन्तेजी जालना,आर्या उप्पलवण्णा (वर्धा),आर्या विशाखा (नागपुर),करुणाशीला (नागपुर) यांचा धम्मदेशनेत सहभाग असणार आहे.
सायंकाळी ५ वाजता उपासकांना भोजनदान देण्यात येणार आहे.
तद्नंतर सायंकाळी ६.०० वाजता भिक्खुसंघाद्वारे मंगलमैत्री देण्यात येणार आहे.
आम्रवन दिक्षाभुमी सुगतकुटी भिक्खुसंघ संस्था मालेवाडा व परिसरातील संपुर्ण उपासक व उपासिका बौध्द पंचकमेटी,भिमज्योती महिला मंडळ,गुरुदेव सेवा मंडळ,आदिवासी समाज मालेवाडा,मॉ माणिकादेवी आदिवासी समाज मंडळ,उज्वल महिला ग्रामसंघ मालेवाडा,परिसरातील सर्व बौध्द पंचकमेटी यांचा सहभाग दोन दिवसीय कार्यक्रमात असणार आहे.



