Home Social मुनघाटे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

मुनघाटे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

भाविकदास करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

       धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा- संचालित, श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे, कला – वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि रासेयो विभागाच्या वतीने परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यांत आला.

          याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्धानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय थुल उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,

       “डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या मानवतावादी मूल्यांचे अनुसरण करणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”

        समता, बंधुतामहाविद्यालयातील हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळा देणारा ठरला.

        संविधानाने दिलेल्या अधिकारांचे महत्व, तसेच सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा संदेश विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने आत्मसात करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ राजू किरमीरे डॉ विणा जम्बेवार, डॉ गणेश चुदरी डॉ लांजेवार डॉ प्रवीण गोहणे प्रा डॉ प्रियंका पठाडे प्रा डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार प्रा टिकाराम धाकळे प्रा कैलास खोबरागडे प्रा निवेदिता वटक मॅडम प्रा भाविकदास करमनकर प्रा वसंत आवारी यांची उपस्थिती होती.

      संचालन व आभार प्रा ज्ञानेश बनसोड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी श्री मानापुरे वरिष्ठ लिपिक श्री गोहणे श्री लांबट श्री नन्नावरे श्री राजगडे श्रीमती चंदेल यांच्यासह सांस्कृतिक व रासेयो विभागाच्या सर्व सदस्य विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.