भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
हेल्पिंग हँड बहुउद्देशीय संस्था व बौद्ध समाज धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेने प्रेरित होऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले आणि बाबासाहेबांना खरी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाच्या वेळी कपिल मशाखेत्री, पुरुषोत्तम ढवळे, भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, मयूर मशाखेत्री, धर्मेंद्र मशाखेत्री, अश्विन सोरते, शुभम सालोटकर, प्रदीप सोरते, ज्ञानेश्वर भाऊ, भाजपा तालुका महामंत्री सुभाष भाऊ धाईत तसेच इतर मान्यवर व दानशूर व्यक्ती उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा सौ.पायल मशाखेत्री यांनी सर्व रक्तदाते, सहकारी, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले.



