Home उपक्रम जे एस पी एम महाविद्यालयात मलेरिया व डेंगू जनजागृती कार्यक्रम संपन्न…

जे एस पी एम महाविद्यालयात मलेरिया व डेंगू जनजागृती कार्यक्रम संपन्न…

भाविकदास करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

      श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे तालुका आरोग्य कार्यालय धानोरा व सांस्कृतिक विभाग व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मलेरिया व डेंगू जनजागृती पर कार्यक्रम दिनांक 5 /12 /2025 ला महाविद्यालयात घेण्यात आला.

       याप्रसंगी याप्रसंगी कार्यक्रमाची अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय थूल सर हे होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर कुणाल मोडक वैद्यकीय अधिकारी यांनी भूषवले तर विशेष अतिथी म्हणून डॉ. लांजेवार सर प्राध्यापक वाळके प्राध्यापक प्रियंका पठाडे मंचावर उपस्थित होते.

         वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुणाल मोडक यांनी डेंगू व मलेरिया याबद्दल विद्यार्थ्यांना डेंगू व मलेरिया या विषयी जनजागृती करून त्याबद्दल उपाययोजना कशा पद्धतीने करावयाच्या व प्रतिबंधात्मक कार्यवाही कशी करायची याबद्दल विस्तृत मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून केलं सोबतच मयूर बी कोळी कीटकशास्त्रज्ञ तालुका आरोग्य विभाग धानोरा यांनी सुद्धा डेंगू व मलेरिया याबद्दल विस्तृत अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांविषयी डेंगू मलेरिया विषयी जनजागृती केली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ उदय थूल सर यांनी डेंगू मलेरिया याबाबत विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणातून डेंगू व मलेरिया याविषयी मार्गदर्शन केले.

         या कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने कुमारी आदिती कोडकली कुमारी पल्लवी वायरी अनिल शंकरराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अनिल शंकरवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद व एनएसएस स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.