Home Social सावरी (माकोना) गट ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न…

सावरी (माकोना) गट ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुकांतर्गत सावरी (माकोना) गट ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झालाय.

          याप्रसंगी सरपंच लोकनाथ रामटेके व इतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी विश्वरत्न तथा भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करुन अभिवादन केले.

             याचबरोबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना सामाजिक व आर्थिक समता आणि देशातील नागरिकांची उन्नती याबाबत सविस्तर माहिती दिली.

           याप्रसंगी सरपंच लोकनाथ रामटेके,समाजसेवक बुद्धरत्न शेंडे,सुरेश मेश्राम,सुरेखा शेंबेकर,रामदास खामनकार,दिलीप डांगे,अर्चना हनवते,पुंडलिक गडमडे,ताणबा नागपुरे,धनराज बैले,नलू शेंबडे इतर नागरिक उपस्थित होते.