Home Social नवजीवनमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली…

नवजीवनमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल, सीबीएसई साकोली येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्या सौ. भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका सौ. वंदना घोडीचोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

        कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

        अध्यक्षांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या बहुविध कार्याची, भारताला दिलेल्या संविधानाची तसेच त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकर यांच्याप्रमाणे मेहनत, अध्ययन, शिस्त व सद्भावना यांचा अंगीकार करून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन केले.

        प्रशासकीय अधिकारी यांनी बाबासाहेबांचा प्रसिद्ध मूलमंत्र “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* याचे महत्त्व समजावून सांगत विद्यार्थ्यांना दृढनिश्चयी राहण्याचा संदेश दिला.

          विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

         कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन ज्योति डोंगरावर यांनी केले.