Home Social शंकरपूर ग्रामपंचायत मध्ये युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनी संपन्न…

शंकरपूर ग्रामपंचायत मध्ये युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनी संपन्न…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत शंकरपूर पदाधिकारी व कर्मचारी यांच्या द्वारे विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.

        उपसरपंच अशोक चौधरी आणि इतर पदाधिकारी यांच्या द्वारा भारतरत्न-विश्वरत्न,युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करुन महामानवास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

       आज दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत शंकरपूर येथे महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धापूर्वक,सन्मान व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

      यावेळी उपसरपंच अशोक चौधरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनसंघर्षावर प्रकाश टाकला.

       या कार्यक्रमास अशोक चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत शंकरपूर,निखिल गायकवाड सदस्य ग्रामपंचायत शंकरपूर, ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.