उपक्षम रामटेके/शुभम गजभिये.
चिमूर :- चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात मौजा महादवाडी हे गटग्रामपंचायतचे स्थळ आहे.या गावचे सरपंच भोजराज कामडी हे महादवाडी गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून चिमूरच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात चकरावर चकरा मारीत आहेत.
परंतु त्यांच्या मागणी अंतर्गत अत्यंत महत्वपूर्ण मुलभूत अशा समस्यांकडे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर येथील संबंधित अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत व सरपंच भोजराज कामडी यांच्यासोबत खोटे बोलत आहेत.
सरपंच भोजराज कामडी हे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर येथील अधिकाऱ्यांच्या बनवाबनवी प्रकाराला व खोटारडेपणाला पुरते वैतागले असून आता ते १७ डिसेंबर २०२५ ला आत्मदहन करणार आहेत.
सरपंच भोजराज कामडी यांनी निवेदनात म्हटले आहे की,दिनांक १७/१२/२०२५ रोजी तहसील कार्यालय चिमूर पासून पैदल चालत जाऊन ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय,चिमर येथे आत्मदहन करणार आहे.
सरपंच भोजराज कामडी यांनी मौजा महादवाडी वासियांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी अनेकदा ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर यांच्या सोबत व इतर अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे.त्या पत्रांची संदर्भानुसार माहिती खालील प्रमाणे..
संदर्भ:
१) सरपंच ग्रा.पं महादवाडी यांचे पत्र दिनांक १९/०८/२०२५..
२) दिनांक १४/०८/२०२५ रोजी कार्यकारी अभियंता यांचेसह महादवाडी पाणी पुरवठा नळ योजनेला भेट दिली.
३) ग्रा.पा.पुरवठा कार्यालय चिमुर दिनांक ०१/०९/२०२५ जा.क्र. ११७/२०२५ पत्र…
४) सरपंच ग्रा.पं महादवाडी यांचे पत्र दिनांक ०१/०९/२०२५…
५) तहसीलदार चिमुर यांचे पत्र दि.२९/०९/२०२५…
६) सरपंच ग्रा.पं महादवाडी पत्र यांचे पत्र दि.२६/०९/२०२५..
७) सरपंच ग्रा.पं महादवाडी यांचे पत्र दि.०१/१०/२०२५…
सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे की मौजा महादवाडी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून आरो प्लांट बसविण्याचे आश्वासन ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.
परंतु आजपर्यंत कोणतेही प्रत्यक्ष काम झालेली नाही.अधिकारी वारंवार “लवकरच आरो प्लांट बसवला जाईल असे लेखी व तोंडी सांगून मौजा महादवाडी ग्रामस्थांची सतत फसवणूक व दिशाभूल करीत आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या आश्वासनांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून त्यांच्यावर गंभीर मानसिक ताण आलेला आहे.
मौजा महादवाडी येथील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणाव हा असाह्य असल्याने,जबाबदार सरपंच म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर येथील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला अनुसरून आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्याची अवस्था त्यांच्यावर ओढावली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
यामुळे दिनांक १७/१२/२०२५ रोजी मौजा महादवाडीचे सरपंच व गावकरी मिळून तहसील कार्यालय चिमूर पासून पैद चालत जाऊन ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय,चिमुर येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपुर,उपविभागीय दंडाधिकारी चिमूर,तहसीलदार चिमुर,गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमुर,उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुरर,ठाणेदार पोलीस स्टेशन चिमर यांना देण्यात आल्या आहेत.
मात्र प्रश्न हा निर्माण होतो की,सरपंच सारख्या जबाबदार व्यक्तींना ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूर च्या अधिकाऱ्यांनी खोटे आश्वासन का म्हणून दिले व बनवाबनवी का म्हणून केली?



