Home Social स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चिमूर तालुक्यातील शौचालय बांधकामांची सविस्तर चौकशी करावी,:- उपसरपंच...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चिमूर तालुक्यातील शौचालय बांधकामांची सविस्तर चौकशी करावी,:- उपसरपंच अशोक चौधरी यांचा मागणी… — ग्रामीण विकास मंत्री व प्रधान सचिवांना दिले निवेदन….

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

        मौजा चिमूर तालुक्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकामातील गंभीर अनियमितता,भ्रष्टाचार,निधी दुरुपयोग व बनावट कागदपत्रांबाबत – तात्काळ उच्चस्तरीय चौकशी आदेशित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा आशयाची मागणी ग्रामीण विकास मंत्री व प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.

           निवेदनात म्हटले आहे की,मौजा चिमूर तालुक्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकामाच्या कामात अत्यंत गंभीर प्रकारच्या अनियमितता,निधीचा दुरुपयोग,निकृष्ट दर्जाचे काम,कागदोपत्री खोटे दाखले,तसेच ग्रामस्थांच्या तक्रारींची जाणीवपूर्वक दखल न घेणे असे अनेक गंभीर प्रकार घडले आहेत.

       निवेदनधारकांचे म्हणणे आहे की त्यांनी या संबंधी अनेक वेळा विभागीय कार्यालयाला लेखी तक्रारी,माहिती अधिकार अर्ज,प्रथम अपील व द्वितीय अपील (राज्य माहिती आयोग, नागपुर) दाखल केले असूनही संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

           या प्रकारामुळे स्वच्छ भारत मिशनसारख्या राष्ट्रीय अभियानाची बदनामी होत असून सार्वजनिक निधीचा थेट अपव्यय होत आहे व भ्रष्टाचारास संरक्षण दिले जात आहे असा गंभीर आरोप उपसरपंच अशोक चौधरी यांचा आहे.

   मागण्या…..

1. मौजा चिमूर तालुक्यातील स्वच्छालय बांधकाम कामांची उच्चस्तरीय,तटस्थ व स्वतंत्र चौकशी त्वरित आदेशित करण्यात यावी.

2. सर्व मोजणी नोंदी,बिल-वाउचर,एम.बी बुक,भू-तपासणी (Geo-tag) नोंदी,फोटो पुरावे यांची तपासणी करून प्रत्यक्ष स्थितीची पडताळणी करण्यात यावी.

3. तक्रारी असूनही कारवाई न करणाऱ्या आणि तथ्य दडपणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत/ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांवर कठोर विभागीय/दंडात्मक/निलंबन कारवाई करण्यात यावी.

4. कागदोपत्री दाखवलेले शौचालये प्रत्यक्षात नसल्यास किंवा निकृष्ट दर्जाचे असल्यास गुन्हेगारी कारवाई व नुकसान भरपाईची वसुली करण्यात यावी.

5. पूर्ण चौकशी अहवाल शासनस्तरावर सादर करून ग्रामस्थांना योग्य न्याय मिळवून द्यावा.

               निकृष्ट दर्जाचे शौचालय बांधकाम संबंधाने चिमूर तालुक्यातील ग्रामस्थांना या अनियमिततेमुळे गंभीर त्रास सहन करावा लागत असून यास तात्काळ मंत्रीस्तरावर हस्तक्षेपाची नितांत गरज आहे. आपण याकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कठोर कार्यवाही करण्यासंबंधाची मागणी,ग्रामीण विकास मंत्री व प्रधान सचिव यांच्याकडे शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.